जाहिरात-9423439946
अपघात

समृद्धी महामार्गावर अपघात,टी . व्ही.सिरियल मधील कलाकार जखमी!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  बिग बॉस मधील सिझन-२०१८ मधील कलाकार हा आज सकाळी १०.३० वाजता वाजता टोयोटा हायलेक्स गाडीने मुंबईवरून नागपूर येथे जात असताना सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनेज क्रमांक ५३८ जवळ पाथरे शिवारात दोन गाड्या मधून जात असताना एका वाहनाने कट मारल्याने मागील बाजूच्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात होऊन शिवआशिष मिश्रा (वय-४०) हल्ली मुक्काम मुंबई मूळ रा.इंदोर हे गंभीर जखमी झाले असून बरगडीला गंभीर इजा पोहचली आहे.त्याचा सहकारी धर्मेंद्र दुबे (पंडित) नावाचा इसम किरकोळ जखमी झाला आहे.

जखमी अभिनेता शिव आशिष मिश्रा उपचार घेताना दिसत आहे.

  त्यांच्यावर कोपरगाव नजिक असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे डॉ.प्रसाद उंबरकर हे उपचार करत आहेत.

शिवाशीश मिश्रा यांचे छायाचित्र.

  ‘बिग बॉस मराठी’ हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लोकप्रिय रिॲलिटी शो आहे,जो डच ‘बिग ब्रदर’ फॉरमॅटवर आधारित आहे.

दरम्यान या अपघातात त्यांच्या गाडीचे झालेले मोठे नुकसान दिसत आहे.

  दरम्यान त्यांनी सन-२००६ मध्ये काम करण्यासह त्यानी ‘संकट मोचक महाबली हनुमान ‘ या लोकप्रिय मालिकेत काम केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शिवआशिष मिश्रा हे बिग बॉस १२ (२०१८) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.ते उद्योजक आणि मॉडेल आहेत. 

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा. https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close