जलसंपदा विभाग
निळवंडे कालव्यांस..इतक्या कोटींचा निधी मंजूर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामास निळवंडे कालवा कृती समितीच्या प्रयत्नाने निळवंडे कालव्याना आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांनी माजी.खा.प्रसाद उर्फ बापूसाहेब तनपुरे साहेब व ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सहकार्याने ३६५ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी दिली आहे.त्याबद्दल लाभक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे अभिनंदन केले आहे.
निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे कालव्यासाठी रस्त्यावरील व सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायिक लढा करून सतरा मान्यता व निधी मिळविण्याचे काम सातत्याने केले आहे.या निधीसाठी माजी खा.प्रसाद उर्फ बापूसाहेब तनपुरे,ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मोठे प्रयत्न कारणीभूत ठरले असल्याची माहिती कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी दिली आहे.
या बाबत निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक
मार्गदर्शक-नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,
कार्याध्यक्ष मच्छिन्द्र दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,संदेश देशमुख,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,विठ्ठलराव पोकळे,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रमेश दिघे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले, महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,विठ्लराव पोकळे,संतोष तारगे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,सोपान थोरात,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,अशोक गाढे,रावसाहेब थोरात,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,भाऊसाहेब चव्हाण,अलिमभाई सय्यद,शब्बीरभाई सय्यद आदींनी समाधान व्यक्त केले आहे.