जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चंद्रकांत ठोळे यांचे निधन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक व श्रीमान गोकुळकंद विद्यालयाचे गेली 45 वर्षे अध्यक्षपद भूषवलेले चंद्रकांत नानुराम ठोळे (वय -८५वर्षे ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक बहीण,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर काल सकाळी 11 वाजता कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.चंद्रकांत ठोळे यांचे छायाचित्र.

स्व.चंद्रकांत ठोळे हे कोपरगाव शहरातील मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते त्याच बरोबर एक प्रसिध्द व्यापारी,शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तम मार्गदर्शक,दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.त्यांनी कोपरगाव पीपल्स बँकेसह कोपरगाव मर्चंट बँक आदींचे संचालकपद भूषवले होते.त्यांच्या निधनाने कोपरगाव आणि तालुक्यातील एक सर्व परिचित व्यक्तिमत्व गमावले अशी भावना व्यक्त होत आहे.

    स्व.चंद्रकांत ठोळे हे कोपरगाव शहरातील मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते त्याच बरोबर एक प्रसिध्द व्यापारी,शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तम मार्गदर्शक,दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.त्यांनी कोपरगाव पीपल्स बँकेसह कोपरगाव मर्चंट बँक आदींचे संचालकपद भूषवले होते.या शिवाय व्यापारी धर्मशाळेचे ते अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चार वर्षे काम पाहिले होते.कै.चंद्रकांत ठोळे यांच्या निधनाने कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय आणि परिवाराची मोठी हानी झाली असल्याचे मानले जात आहे.ते आनंद फॉर्मचे संचालक आनंद ठोळे यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने कोपरगाव आणि तालुक्यातील एक सर्व परिचित व्यक्तिमत्व गमावले अशी भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close