जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गेट परीक्षेतील स्कोअरच्या आधारे सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संधी -…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
   
  गेट परीक्षेतील चांगल्या स्कोअरच्या आधारे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासोबतच विविध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात आणि “गेट्सची परीक्षा केवळ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून सायन्स शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थीही या परीक्षेस पात्र असल्याचे प्रतिपादन .गेट परीक्षेतील चांगल्या स्कोअरच्या आधारे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासोबतच विविध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन  आय.आय.टी.मुंबई येथील  रसायन अभियांत्रिकीतील संशोधक संथाकुमार व्ही.यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आय.आय.टी.जे.ए.एम.व गेट परीक्षा यांसारख्या स्पर्धात्मक व उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांचे विशेष महत्त्व असून या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होत आहे.बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या पलीकडे संशोधन,उद्योग,उद्योजकता व नव्या ज्ञानक्षेत्रांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे”-डॉ.माधव सरोदे,प्राचार्य, श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालय,कोपरगाव.

    एम.एस्सी.साठीची जॉइंट ऍडमिशन टेस्ट ही भारतातील नामांकित संस्था जसे की भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था मध्ये एम.एस्सी.व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा मानली जाते.त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय अंतर्गत रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी आयोजित ‘आय.आय.टी.जे.ए.एम.व गेट परीक्षा अवरनेस या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

   सदर प्रसंगी व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ,विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.निलेश मालपुरे,डॉ.विलास गाडे,प्रा.अश्विनी पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.शिवाय महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसह पदवी व पदव्युत्तर बी.एस्सी व बी.सी.एस.वर्गातील विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आय.आय.टी.मुंबई येथील रसायन अभियांत्रिकी तील संशोधक साईकत साहा यांनी,“मूलभूत विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आय.आय.टी.जे.ए.एम. (एम.एस्सी ची जॉइन ऍडमिशन टेस्ट) परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले,”आय.आय.टी.सारख्या नामांकित संस्थांमध्ये एम.एस्सी.,संयुक्त एम.एस्सी.पी.एच.डी. किंवा इंटिग्रेटेड पी.एच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी जे. ए.एम.ही एक सुवर्णसंधी आहे.योग्य नियोजन,संकल्पना स्पष्ट असणे आणि नियमित सराव यांच्या जोरावर ही परीक्षा सहज उत्तीर्ण करता येते.”तसेच  त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम,परीक्षेचे स्वरूप,गुण पद्धत आणि वेळेचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत स्पर्धा अकॅडमीचे संचालक प्रा.चंद्रभान चौधरी यांनी केले आहे तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले तर आभार प्रा.ऋषिकेश सोनवणे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close