जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांवच्या पाणी योजनेस अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षदा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न वर्तमानात अडगळीस पडला असून याबाबत तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यता जानेवारी मध्ये मिळूनही दोन महिने उलटूनही त्यावर आर्थिक मंजुरी अद्याप प्रतीक्षेत अर्थसंकल्पात प्रकल्पास वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या असून ती केंव्हा मिळणार असा रास्त सवाल येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारला आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

राज्य सरकारचा नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला आहे.त्यात उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीनुसार व माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून नुकताच ३६५ कोटींचा निधी मिळाला आहे.तर काकडी विमानतळासाठी नाईट लँडिंगसाठी राज्यस्तरावरून सरकारी धोरण ठरून १५० कोटींचा निधी मिळाला आहे.मात्र त्यात कवडीचा सहभाग नसताना आपल्या अंगावर स्वतःच गुलाल उधळून घेण्याची खोडही जुनीच मात्र तिसऱ्या पिढीत त्यात बदल होईल हि अपेक्षा फोल ठरली आहे.

कोपरगाव शहरात निळवंडे बंदिस्त जलवाहिनी आणण्याच्या आणाभाका अनेक वर्ष निळवंडे शेती सिंचनाच्या प्रश्नासारखाच गत पंधरा-वीस वर्षापासून सुरु आहे.त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याची उत्तर नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील राजकिय नेत्यांची गेल्या तीन पिढ्यांची जुनी खोड आहे.त्याला कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न अपवाद असण्याचे कारण नाही.केवळ निवडणुका जवळ आल्या की त्या प्रश्नाची पिपाणी वाजवायची व आपल्या राजकिय पोळ्या भाजून घेऊन तो प्रश्न पुन्हा अडगळीत टाकायचा हा येथील राजकीय नेत्यांचा आवडता व नेहमीचा शिरस्ता.त्याला कोपरगाव शहर अपवाद असण्याचे कारण नाही.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हा सोडवायचा नाही आणि आपल्या निवडणुका पार पाडायच्या हि काही नवी राजकीय सोय नाही मात्र त्याला अपवाद वर्तमान तिसऱ्या पिढीतील नेतृत्व ठरेल का हा खरा प्रश्न.त्या बाबत कोपरगावकरांची पिण्याच्या पाण्याबाबत रास्त अपेक्षा मात्र फलद्रुप होणार की नाही हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोपरगांव शहराच्या पाणी प्रश्नाविषयी आग्रही असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नगर विकास मंत्रालयाच्या पडताळणी समितीने १२३ कोटींच्या पाणी योजनेस दि.०३ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता मंजुरी दिली होती.त्यावेळेस आ.आशुतोष काळे व शहराच्या सर्वसामान्य नागरीकांच्या वतिने आपण समक्ष हजर असल्याचा दावा मंटाला यांनी केला आहे.त्यानंतर नस्ती नगर विकास मंत्रालयाने अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळून आता सदर आर्थिक मान्यता मिळणे बाकी आहे.ती कार्यवाहीसाठी पुढे अर्थ विभागाकडे पाठवली आहे.दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप आर्थिक मंजुरी मिळालेली नाही.
त्यामुळे अर्थ संकल्प जाहीर होऊनही ती मिळालेली नाही.त्यामुळे हि आर्थिक मंजुरी कधी मिळणार ? आणी प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार ? या बाबत नागरीकांकडून विचारणा होत आहे.
आमदार काळे आता नामदार झाले आहे.त्यांचे वरिष्ठ पातळीवर वजन वाढले असल्याची शक्यता आहे.त्यामुळे तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना या बाबत माहिती द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close