जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

समन्यायी पाणी वाटपाचे पाप माजी आ.कोल्हे यांचेच-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा हा २००३ साली तयार झाला होता.त्यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे तालुक्याचे आमदार होते.त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने त्या मसुद्याला त्याच वेळी विरोध केला असता तर समन्यायी पाणी वाटप कायदाच अस्तित्वात आला नसता.त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच पाप हे तुमचंच आहे असा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी कोल्हेंना लगावला आहे.

“समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी या कायद्याचा मसुदा २००३ ला तयार करण्यात आला. त्यावेळी आमदार या नात्याने शंकरराव कोल्हे मसुदा समितीचे सदस्य होते.या कायद्यामुळे अगोदरच तुटीच्या असलेल्या गोदावरी लाभक्षेत्रावर अन्याय होणार याची कल्पना त्यांना आली नाही का ? निवडणूका पाहून लोकांना नादी लावण्याचे उद्योग आता सोडले पाहिजे-सोमनाथ चांदगुडे,माजी अध्यक्ष भाजप कोपरगाव तालुका.

कोल्हे हस्तकांच्या पाणी वाटप कायद्याला मूक संमती दिल्याच्या आरोपचे खंडन करतांना सोमनाथ चांदगुडे यांनी,”समन्यायी पाणी वाटप कायद्याचे सूत्रधार असलेले विरोधकच चुकीचे आरोप करून दुसऱ्याकडे बोट दाखवीत असले तरी,चार बोटे मात्र त्यांच्याकडे असल्याचे म्हटले आहे.समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी या कायद्याचा मसुदा २००३ ला तयार करण्यात आला. त्यावेळी आमदार या नात्याने शंकरराव कोल्हे मसुदा समितीचे सदस्य होते.या कायद्यामुळे अगोदरच तुटीच्या असलेल्या गोदावरी लाभक्षेत्रावर अन्याय होणार याची कल्पना त्यांना आली नाही का ? परंतु विरोध करायचे सोडाच या कायद्याची हेरिंग देखील या तत्कालीन आ.कोल्हे यांनी त्यावेळी नाशिक येथील जलसंपदा विभाग,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथे घेतली नाही.त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच पाप हे तुमचंच आहे ते पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका असे आवाहन केले आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा २००३ ला तयार केल्यानंतर २००५ ला समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात आला त्यावेळी माजी आ.काळे हे विरोधी पक्षाचे आमदार होते.त्यांनी सर्वप्रथम समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात याचिका माझ्याच नावावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करून आजही सर्वोच्च न्यायालयात समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात लढत आहेत हे देखील विरोधकांनी सांगितले पाहिजे त्यामुळे पूर्वेतिहास चाळण्याची खरी गरज विरोधकांना आहे.पाणी प्रश्न हा काळे परिवारासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे १९८४ पासून गोदावरी कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे यांनी उभारलेला लढा आजही माजी आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई लढत आहेत.याउलट पोटात एक आणि ओठावर एक अशी भूमिका बजावत असलेले विरोधक मात्र टीका करून नेहमीप्रमाणे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने सगळ्यांना दिला आहे.त्यामुळे टीका करण्याची पात्रता तुम्ही कशाला तपासता.तुमच्यावर लोकशाहीच्या माध्यमातून केलेल्या टीकेचे उत्तर असेल तर द्या.उगाच बिनबुडाचे आरोप करू नका असे आवाहनही चांदगुडे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close