कोपरगाव तालुका
कोपरगावात मोठ्या प्रतीक्षेनंतर अशासकीय समित्यांची निवड जाहिर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय सदस्यांची निवड श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनीं नुकतीच केली आहे.
शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेसचे सरकार येऊन जवळपास अडीच वर्षे झाले तरी जिल्ह्यातील सर्व संजय गांधी आर्थिक दुर्बल अनुदान योजना समितीच्या अध्यक्षांची निवड झालेली नव्हती.अध्यक्ष आणि समितीची निवड त्या तालुक्यातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली होते.मात्र त्यास पालकमंत्र्यांची शिफारस बंधनकारक आहे.मात्र पालकमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याने त्या उशिरा जाहीर केल्या आहेत.
अपंग,विधवा,वृध्द निराधार लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी केली जाते.या योजनेतून पात्र लाभार्थीला दर महिन्याला ६०० ते ९०० रूपये दिले जातात.लाभार्थी निवडीसाठी प्रत्येक तालुक्यात समिती असते.समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थीस अुनदान सुरू होते.यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समित्या स्थापन होतात.त्यात सार्वजनिक संस्थांचे प्रतिनिधी,समाजाची मान्यता असलेली व्यक्ती अशा व्यक्तींचा अंतर्भाव असणे गरजेचे असताना त्या गोष्टीला राजकीय सोयीसाठी सर्वत्र फाटा दिलेला दिसून येतो कोपरगाव तालुकाही अपवाद दिसून येत नाही.
कोपरगाव तालुक्यात निवडून दिलेल्या व्यक्तींमध्ये तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी सुभाष मारुती अहिरे (धामोरी),नारायण सोपान बर्डे (टाकळी),भारती बाळू देवकर (टाकळी),बाळासाहेब पुंजाजी घायतडकर (रवंदे),रामदास भाऊसाहेब खटकाळे (लौकी),आत्मा समितीच्या सदस्य रोमेश श्रीकांत बोरावके (कारवाडी),जयश्री सुनील मलिक (कासली),सीता मोहन सोनवणे (सोनारी),रागिणी प्रकाश गवळी (मढी बु.),गणेश निवृत्ती घुमरे (हंडेवाडी),श्रावण निवृत्ती आसने (ब्राम्हणगाव), आदींचा समावेश आहे.
कोपरगाव नगरपरिषद स्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती प्रकाश सुखदेव दुशिंग,दिनकर खरे,माधवीताई राजेंद्र वाकचौरे,लक्ष्मण माधव सताळे,संदीप सावळेराम पगारे,रशिद बुढण शेख सर्व राहणार कोपरगाव आदींचास समावेश आहे.
संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साधना अनिल दवंगे (मुर्शतपूर),शंकरराव गहिनाजी चव्हाण (चांदेकसारे),श्रीधर दत्तू कदम (सुरेगाव),राजेंद्र रामचंद्र कोल्हे (देर्डे चांदवड),नारायण बारकुजी मांजरे (धामोरी),धर्मा शिवराम जावळे (सोनेवाडी)आदींचा समावेश आहे.
तर तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समिती सदस्य सुनील भास्कर मोकळ (मढी बु.),बाबुराव कारभारी थोरात (जवळके),चित्राताई मच्छिंद्र बर्डे (चासनळी),रोजगार हमी योजना समिती सदस्य अनिल मनोहर खरे (कारवाडी),राजेंद्र आण्णासाहेब पाचोरे (शहापूर),रविंद्र अशोक पिंपरकर (ब्राम्हणगाव)
तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य संतोष आण्णासाहेब पवार (आपेगाव) दुष्काळ निवारण समिती सदस्य विष्णू जयंतराव शिंदे (मुर्शतपूर),सुरेखा चंद्रभान बढे(कुंभारी),अवैध दारू प्रतिबंध समिती राजेंद्र शंकरराव निकोले (येसगाव) यांचा समावेश आहे.सर्व विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय नवनिर्वाचित सदस्यांचे आ.काळे यांनी अभिनंदन केले आहे.