निधन वार्ता
वाल्मिकराव कुहिले यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रामवाडी परिसरातील रहिवासी व प्रगतशील शेतकरी वाल्मिकराव बबनराव कुहिले (वय-57)यांचे आज शुक्रवार दि.२१ ऑगस्ट रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता

कै.वाल्मिकराव कुहिले यांचा सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रात चांगला सहभाग होता.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्यामागे बाळासाहेब कुहिले,सुनील कुहिले हे दोन बंधू,तर मुलगा संकेत कुहिले,पत्नी असा परिवार आहे.
कै.वाल्मिकराव कुहिले यांचा सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रात चांगला सहभाग होता.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्यामागे बाळासाहेब कुहिले,सुनील कुहिले हे दोन बंधू,तर मुलगा संकेत कुहिले,पत्नी असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर व रामवाडी पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.वाल्मिकराव कुहिले यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे,संवत्सरचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मणराव परजणे,बंडू नाना आचारी यांनी शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



