जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात रस्ता लूट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

येवला तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी बाबासाहेब सीताराम आहेर (वय-४९) यांच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह चार अज्ञातच चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरून पळवून नेला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर येसगाव जवळ सदर ट्रॅक्टर जात असताना महिंद्रा बोलेरो गाडीतून आलेले संशयित चार आरोपी यांनी आपली गाडी ट्रॅक्टरला आडवी घालून ट्रॅक्टर आडवून दमदाटी देऊन भ्रमणध्वनिसह रस्त्याने चालू असलेला फिर्यादीच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह चार अज्ञातच चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरून पळवून नेला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी बाबासाहेब आहेर हे येवला तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असून त्यांचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे.दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर येसगाव जवळ सदर ट्रॅक्टर जात असताना महिंद्रा बोलेरो गाडीतून आलेले संशयित चार आरोपी यांनी आपली गाडी ट्रॅक्टरला आडवी घालून ट्रॅक्टर आडवून दमदाटी देऊन भ्रमणध्वनिसह फिर्यादीच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह चार अज्ञातच चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरून पळवून नेला आहे.आधी फिर्यादिस आपला ट्रॅक्टर कर्जदार बँकेने नेला असावा असा संशय आला मात्र चौकशी केली असता त्यात तथ्य आढळले नाही शेवटी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी बाबासाहेब आहेत यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४५/२०२२ भा.द.वि.कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिसनिरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पो.नीं.आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close