जाहिरात-9423439946
दळणवळण

‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही भारताच्या विकासाचे प्रतिक-पंतप्रधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबई-(प्रतिनिधी)
रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे.आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे.महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे.यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येणार आहे.नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे.त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे”-देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.तसेच पंतप्रधान यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गाव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील,विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आ. प्रविण दरेकर,आ.आशिष शेलार,आ. राम कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी,संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात करत पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की,”भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे.आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचाआणि आनंदाचा आहे.आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन वाहतूकीला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी,विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्वाचा दिवस आहे.आतापर्यंत देशात एकूण १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या
आहेत.देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करण्यात आली आहे.नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांना जाण्यासाठी तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,तुळजाभवानी मंदिर,सिध्देश्वर मंदिर,श्री स्वामी समर्थ येथे भाविकांना जाता येणार आहे.शिर्डी,पंढरपूर,अक्कलकोट,तुळजापूर या तीर्थ क्षेत्राला जाण्यासाठी भाविकांचा प्रवास जलद होणार आहे.वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव्या भारताच्या विश्वासाचा संकल्प असून आधुनिक भारताची शानदार प्रतिमा निर्माण करत आहे.देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या १० ट्रेन सुरू झाल्या असून त्यामुळे १७ राज्यात १०८ जिल्हे जोडले गेले असल्याचेही श्री. मोदी आपल्या भाषणात म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”मुंबई मध्ये पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे.रेल्वे,नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत.दहा लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे.आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असलयाचेही श्री. मोदी आपल्या भाषणात सांगितले.

अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील-मुख्यमंत्री शिंदे

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीयअर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५००कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे,त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले की,सिंचन, रस्ते प्रकल्प,कृषी,पायाभूत सुविधा,गृहनिर्माण,स्टार्टअप,महाराष्ट्र सर्व क्षेत्रात या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे,असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे.पंतप्रधानांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते,त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे.अशाच रीतीने एमटीएचएल,मेट्रोचे इतर मार्ग,मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी-केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

रेल्वेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे.यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे.‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजूरीचे काम पूर्णत्वास झाले आहे.
अद्यावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाडया धावतील असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close