धार्मिक
…या साईभक्तांच्या साक्षीने साजरा होणार ‘साई परिक्रमा सोहळा’

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील साईबाबाप्रति भाविकांची अढळ श्रद्धा असून गेल्या वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा सोहळा साजरा झाला होता,त्याचप्रमाणे यंदाचा सोहळा साई परिक्रमा महोत्सव २०२३ देशविदेशातील भाविकांच्या साक्षीने साजरा होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दोन्ही मागील छायाचित्र.
साई भक्तांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येणार आहे.शिर्डीतील अनेक हॉटेल मालकांनी साई भक्तांसाठी सवलतीच्या दरात रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत.साई सिद्धी रिक्षा संघटना व जागृती रिक्षा संघटना यांचेकडून मोफत रिक्षा सेवा पुरवण्यात येणार आहे. परिक्रमेच्या शेवटी साई भक्तांसाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. स्वच्छ परिक्रमा वारीसाठी स्वच्छता टीम असणार आहे.ठीक ११.४५ वाजेपर्यंत शताब्दी स्टेज १६ गुंठे येथे सांगता समारोह संपन्न होणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.
या महोत्सवाची तयारी करतांना ग्रीन एन क्लीन फाउंडेशन,शिर्डी ग्रामस्थ,शिर्डी नगरपरिषद,शिर्डी पोलीस स्टेशन व सांईभक्त त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे.तीन महिन्यापूर्वी श्रीमती भाग्यश्री बानाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत साईची परिक्रमा करून साईच्या परिक्रमेची तारीख घोषित केली होती.समाज माध्यमातून जगभरातील भक्तांपर्यंत परिक्रमेचे निमंत्रण पोहोचवले आहे.
या शिर्डी परिक्रमेसाठी संपूर्ण महाराष्ट्र व सर्व राज्यातून साई भक्तांनी प्रत्यक्ष संपर्क करून सहभागी होण्याचे मनोदय व्यक्त केला आहे अमेरिका येथील पेंसिनलिविया येथून ५०साई भक्त येणार आहे.सोमवार दि.१३ फेब्रुवारी पार्टी सकाळी ५ वा.३० मि.श्री खंडोबा मंदिर या ठिकाणी महंत रामगिरीजी महाराज महंत काशीकानंदजी महाराज, राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील, राज्याचे शिक्षण मंत्री नामदार श्री दीपकजी केसरकर, शिर्डी लोकसभेचे खासदार श्री सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व शिर्डीतील प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पूजा व आरती केली जाणार आहे.
रतलाम येथून आलेला साई परिक्रमा रथ व त्यातील श्री साईबाबांच्या प्रतिमेची पूजा संपन्न होऊन ठीक ५.४५ वा शिर्डी परिक्रमे सुरुवात होईल परिक्रमेचे अग्रभागी परिक्रमा निशान त्यानंतर गुजरात येथून आलेली भव्य साई मूर्ती रथ शिर्डी परिसरातील विविध विद्यालयांचे चित्ररथ लेझीम पथक व विद्यार्थ्यांचे पथनाट्य विविध प्रकारची वाद्य टाळ मृदंग भजनी मंडळ सहभागी होतील
रतलाम येथील ५०० साई भक्तांच्या उपस्थितीत छत्र पवित्र चादर शंखनाद व २५० किलो धूप व श्री साईचा रथ यांचा समावेश आहे
परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी दानशूर शिर्डीचा ग्रामस्थ व अनेक साई भक्तांनी पाणी चहा बिस्कीट अल्पपोहार फळे यांची व्यवस्था केलेली आहे.परिक्रमेत ५०० स्वयंसेवक आपली सेवा देणार आहे यात साई निर्माण करिअर अकॅडमी श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल एस ए जे एम कॉलेज यांचे विद्यार्थी यांचा समावेश आहे. शिर्डी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या वतीने अतिरिक्त पोलीस व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आलेले आहे. सोबत व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.यावर्षी साई भक्तांसाठी मदत केंद्र व रजिस्ट्रेशन कक्ष करण्यात आलेले आहे.राहता तालुक्यातील प्रथमोपचार केंद्र व मोफत औषध पुरवण्यात येणार आहे डॉ.सुभाष गुजराती मेमोरियल हॉस्पिटल व डॉक्टर जोशी हॉस्पिटल यांचे कडून डॉक्टर व तज्ञ सहकारी यांची सेवा मिळणार आहे त्याचबरोबर साई निर्माण पॅरामेडिकल कॉलेजचे ५० विद्यार्थी सेवा देणार आहेत.गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला महिलासाठी अल्पोपहार व्यवस्था व उजव्या बाजूस पुरुषांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.प्रसाधन गृहाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा सडा व मुंबई येथील साई भक्तांकडून सुबक अशी रांगोळी काढून परिक्रमा मार्ग सजवण्यात येणार आहे.साकुरी शिव येथे मोठ्या प्रमाणात साई भक्तांसाठी फळांचे वाटप करण्यात येणार आहे.