दळणवळण
‘त्या’ उड्डाणपुलाचे श्रेय संधीसाधूंनीं लाटू नये-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या सिन्नर-शिर्डी या एन.एच.-१६० या राष्ट्रीय महामार्गावर झगडे फाटा नजीक होणारा उड्डाण पूल आ.आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून हा उड्डाण पूल कोपरगाव संगमनेर महामार्गावर घेण्याच्या सूचना केल्या अनेक पर्यायांची चाचपणी करून हा पूल कोपरगाव-संगमनेर महामार्गावर करण्याचे पार पडलेल्या बैठकीत त्यावेळी निश्चित करून झगडे फाट्यावर होणाऱ्या पुलाचा प्रश्न मार्गी लावला काही संधीसाधूंना हे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रोहिदास होन यांनी नुकतीच केली आहे.
तत्कालीन सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मार्गे नगर सिन्नर हा राष्ट्रीय महामार्ग सन-२०१३ साली तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांकडून मंजूर केला होता.या राष्ट्रीय महामार्ग १६० चे काम वर्तमानात वेगाने सुरु आहे.त्याच्या झगडे फाटा येथील उड्डाण पुलावरून आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे यांच्यात वर्तमानात राजकीय कलंगीतुरा रंगला आहे.त्यामुळे तालुक्याची चांगलीच करमणूक होत आहे.
तत्कालीन सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मार्गे नगर सिन्नर हा राष्ट्रीय महामार्ग सन-२०१३ साली तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांकडून मंजूर केला होता.या राष्ट्रीय महामार्ग १६० चे काम वर्तमानात वेगाने सुरु आहे.त्याच्या झगडे फाटा येथील उड्डाण पुलावरून आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे यांच्यात वर्तमानात राजकीय कलंगीतुरा रंगला आहे.या एन.एच.-१६० या राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित आराखड्यात कोपरगाव तालूक्यातील झगडे फाटा येथे उड्डाण पूल होणार होता.उड्डाण पूल होणार असल्यामुळे रहदारी जरी सुरळीत होण्यास मदत होणार असली तरी ज्या ठिकाणी झगडे फाट्यावर हा उड्डाणपूल होणार होता त्या ठिकाणी वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या छोट्या.मोठ्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होणार होता.त्यामुळे या व्यावसायिकांनी आ.काळे यांची भेट घेवून उड्डाण पुलाच्या नियोजित जागेत बदल करावा अशी मागणी केली होती.
त्याबाबत आ.काळे यांनी एन.एच.-१६० या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन वेळेस बैठका घेतल्या होत्या असा दावा आ.काळे यांच्या समर्थकांनी केला आहे.व उड्डाण पुलामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्यामुळे पर्यायी जागेवर हा उड्डाण पूल उभारावा याबाबत सकारात्मक चर्चा होवून या अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलाच्या नियोजित जागेत बदल करण्याचे निश्चित झाले होते.त्यानुसार हा उड्डाण पूल कोपरगाव-संगमनेर महामार्गावर होणार आहे.परंतु याबाबत ज्यांचे काडीचे योगदान नाही.कोणताही पाठपुरावा नाही ते आज उड्डाणपूलाची जागा आमच्यामुळे बदलल्याच्या हास्यास्पद बढाया मारीत आहे.
ज्यावेळी समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून जाणार होता.त्यावेळी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जिरायती दाखवून जमिनी लाटल्या जात होत्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गामध्ये जाणार होत्या त्या शेतकऱ्यांना बी.पी.शुगरचे आजार जडले होते.त्यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करायला यायला अमावस्या असल्यामुळे ज्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले ते काय उड्डाण पुलाची जागा बदलणार असा टोला रोहिदास होन यांनी शेवटी श्रेयवाद्यांना लगावला आहे.