जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात आठवड्यात दुसऱ्यांदा ऍट्रॉसिटी,एक आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत सहा दिवसापूर्वी एक ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन आठ्वडाही उलटला नाही व एक आरोपी अद्याप फरार असतानाच काल रात्री पुन्हा कोळपेवाडी येथे असा एक गुन्हा दाखल झाला असून यातील फिर्यादी नर्सिंगचा विद्यार्थी यश राजेंद्र मगर याने आरोपी पवन बबन कोळपे (वय-२१) व राजू ढोणे दोघे रा.कोळपेवाडी यांचे विरुद्ध ऍट्रॉसिटीसह रॅगिंगचा असे एकत्रित दोन गुन्हे दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अनुसूचित जाती-जमातींविरोधात अत्याचार झाल्यास भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हे दाखल होतातच पण अ‍ॅट्रॉसिटीनुसारही गुन्हे दाखल केले जातात.अनुसूचित जाती आणि जमातींव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत सहा दिवसा पूर्वी घडली असून त्याला सहा दिवस उलटत नाही तोच कोळपेवाडी येथे दुसरी घटना घडली आहे.व या वर्षात हि पाचवी घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,स्वातंत्र्यानंतरही अनुसूचित जाती आणि जमातीं विरोधातील न थांबलेले अत्याचार आणि कायद्याने त्यांना मिळणारं संरक्षण अपुरं पडत असल्याने ऍट्रॉसिटीचा कायदा आणण्यात आला.या कायद्यामुळे अनुसूचित जाती-जमातींविरोधात अत्याचार झाल्यास भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हे दाखल होतातच पण अ‍ॅट्रॉसिटीनुसारही गुन्हे दाखल केले जातात.अनुसूचित जाती आणि जमातींव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत सहा दिवसा पूर्वी घडली असून त्याला सहा दिवस उलटत नाही तोच कोळपेवाडी येथे दुसरी घटना घडली आहे.व या वर्षात हि पाचवी घटना घडली आहे.
दि.२६ नोव्हेंबर रोजी रात्री ०९ ते ९.३० वाजेच्या सुमारास कोळपेवाडी येथील आरोपी पवन बबन कोळपे (वय-२१) व राजू ढोणे यांनी डॉ.कोळपे नर्सिंग कॉलेज येथे फिर्यादी यश मगर हा व त्याचा साथीदार हे सुमित रामहरी दराडे याचा वाढदिवस साजरा करत असताना तेथे आरोपी आले व त्यांनी महाविद्यालयाचे खुल्या मैदानात नर्सिंगच्या आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या वादाच्या कारणावरून यातील फिर्यादी यश मगर व साक्षीदार विकास त्रिभुवन अशांना ते कनिष्ठ जातीचे असल्याचे माहिती असतानाही त्यानां जातीवाचक शिवीगाळ करून,”तुम्ही खालच्या जातीचे आहात,तुम्ही खालीच राहायचे” असे म्हणून अपमानित केले.व विकास त्रिभुवन यास कपडे काढण्यास भाग पाडले तो अंतर्रवस्रावर असताना त्याची चेष्टा करण्यास सुरुवात केली.व तुम्ही तुमचे इज्जतीत राहायचे आम्ही येथून पुढे कॉलेजचा मॅटर असला तरी दखल देणार असे म्हणून धक्काबुक्की करून धमकी दिली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.

घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.४०३/२०२१ अनुसूचित जाती /जमाती (अत्याचारास प्रतिबंध)सुधारणा कायदा-२०१५ विनयभंग-३(१)(डब्ल्यु) (१)(२) जातीवाचक शिवीगाळ-३(१)(ई)(आर) ३(१)(एस) ३(१)(आर),रॅगिंग ऍक्ट कलम १९९९ चे कलम ४ भा.द.वि,कलम-२९४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.
दरम्यान यातील पवन कोळपे हा आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.तर दुसरा राजू ढोणे हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close