दळणवळण
…या बस आगाराला नवीन बस दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून यापूर्वीच कोपरगाव आगारात लालपरी १० व जिजाऊ ०५ नवीन बस मिळाल्या आहेत व पुन्हा एकदा ०७ नवीन जिजाऊ बस दाखल झाल्या असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी केला असून आता नवीन बसची सख्या 22 झाली असून त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“नव्याने ०७ बस मिळाल्यामुळे येणाऱ्या दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे दूर होवून प्रवास सुखकर होईल.यापुढील काळात अजूनही बस कशा मिळविता येतील यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.त्यामुळे बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या महिला भगिनी,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी कायमच्या दूर होतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसेसमुळे होणारा बसचा तुटवडा दूर करण्यासाठी नवीन बसेसचा पुरवठा आता वेगाने सुरू झाला आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ५ हजार नवीन ‘लालपरी’ बसेस दाखल करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून त्याचा पुरवठा सुरू झाला असून कोपरगाव बस आगाराला नवीन पाच बसचा पुरवठा झाला आहे.बस आगाराकडे बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.यामध्ये विद्यार्थी,जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.हि अडचण ओळखून आ.काळे यांनी कोपरगाव आगारासाठी नवीन बस मिळाव्यात यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आजपर्यंत कोपरगाव आगाराला 15 दावा असून आता आणखी 07 नवीन बस मिळाल्या असल्याचा आ.काळे यांनी दावा केला आहे.त्यामुळे आता एकूण नवीन बसची संख्या 22 झाली असल्याची माहिती आहे.त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.तर या दरम्यान,”या बस आपण मिळवल्याचा दावा विधानपरिषदेचे नवीन आ.विवेक कोल्हे यांनी केला असल्याचे प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.



