जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

तालुक्यातील रस्तेकामांच्या निविदा प्रसिद्ध-…यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 
 
   कोपरगाव मतदारसंघाचा विकास साधून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून या पाठपुराव्यातून मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्ण झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहे तर उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नातून मतदारसंघातील ३७ लाख ९३ हजार रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ग्रामीण रस्ते विकास म्हणजे गावे,वाड्या आणि वस्त्यांना मुख्य शहरांशी व बाजारपेठांशी जोडणारे रस्ते बांधणे होय.चांगले रस्ते असल्यामुळे शेतमालाची नेत्याण सोपी होते,शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळणे वेळेत शक्य होते आणि ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास वेगाने होतो.ही गरज ओळखून आ.आशुतोष काळे यांनी नवीन 37.93 लाखांचे रस्ते मंजूर केले आहे.त्यामुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

  ग्रामीण रस्ते विकास म्हणजे गावे,वाड्या आणि वस्त्यांना मुख्य शहरांशी व बाजारपेठांशी जोडणारे रस्ते बांधणे होय.चांगले रस्ते असल्यामुळे शेतमालाची नेत्याण सोपी होते,शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळणे वेळेत शक्य होते आणि ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास वेगाने होतो.ही गरज ओळखून कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय,राज्य,ग्रामीण आणि रस्त्यांची अवस्था तोळा मासा झाली आहे.त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतूद करण्याची नितांत गरज आहे.त्यासाठी आ.काळे हे प्रयत्नशील आहे.त्यात त्यांच्या कामांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यात प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये कोळपेवाडी येथील डॉ.जुंधारे परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १५ लाख ६७ हजार रुपये,कान्हेगाव येथील गोरख विंचू ते दत्तात्रय सांगळे वस्ती रस्ता खडीकरणासाठी १० लाख ३७ हजार रुपये,तसेच चासनळी येथील बारगळ वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी ११ लाख ८९ हजार रुपये अशा एकूण ३७ लाख ९३ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचे प्रयत्न सुरू आहेत.त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली असून आगामी काळातही आवश्यक असलेल्या रस्ते विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

   या रस्त्याच्या कामांमुळे संबंधित गावांतील नागरिकांची दळणवळणाची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.तसेच विद्यार्थी,शेतकरी,कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार असून शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.कोळपेवाडी,कान्हेगाव आणि चासनळी येथील नागरिकांनी या विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले आहे व आ.काळे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close