दळणवळण
…’ त्या’ पुलावरील वाहतूक होणार सुरू,आमदारांनी सोडले फर्मान!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा जुना मुंबई-नागपूर (एन.एच.७५२आय) महामार्ग शाळकरी विद्यार्थी,शेतकरी आणि प्रवासी यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता असल्याने संवत्सर येथे गोदावरी नदीच्या पुलाच्या दुरुस्तीचे काम १५ जून पर्यंत पूर्ण करून पुलावरून वाहतूक सुरु झाली पाहिजे असे फर्मान आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने लोकप्रतिनिधींना उशिराने का होईना जाग आल्याचे मानले जात आहे.

संवत्सर येथील महामार्गावरील गोदावरी नदीवरील पुलाला ऐन मध्यावर तडे गेले होते.ते धोकादायक झाल्यावर गेल्या सहा महिण्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद केली.मात्र पर्यायी संजीवनी कारखाना व शिंगणापूर चौकी मार्ग खड्ड्यात हरवला आहे.त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.म्हणून अवजड वाहतूक दारानी मनाई वस्ती मार्गावरून आपला तांडा वळवला होता.तो एकेरी मार्ग आणि त्यावर अवजड व हलकी वाहने मोठ्या प्रमाणावर धावू लागल्याने
त्याची वाट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे संतापून संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन त्या ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती.त्यामुळे प्रवासी आणि अवजड वाहतुकदारांना तालुक्यात दोन आमदार असूनही कोणीच वाली उरला नव्हता.
मुंबई नागपूर हा राज्य मार्ग युती शासनाच्या काळात नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना गती दिली होती.त्यामुळे त्याकाळात हा सर्वाधिक वेगवान रस्ता ठरून मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी वेळ आणि पैसा वाचवणारा मार्ग ठरला होता.मात्र २०१४ साली राज्यात भाजपचे सरकार आल्यावर व मुख्यमंत्रीपदी विदर्भातील देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्यावर त्यांनी समृद्धी महामार्गाला प्रतिष्ठेचा बनवले होते.व राज्याच्या महत्वाकांक्षी मार्ग म्हणून त्याला ५३ हजार कोटींची तरतूद केली होती.हा मार्ग सुरू झाल्यावर जुन्या मुंबई नागपूर महामार्गाची उपेक्षा सुरू झाली.त्यावरील पुलाकडे दुर्लक्ष झाले.त्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील गोदावरी पुल अपवाद नव्हता.त्या पुलाला ऐन मध्यावर तडे गेले.ते धोकादायक झाल्यावर गेल्या सहा महिण्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद केली.मात्र पर्यायी संजीवनी कारखाना व शिंगणापूर चौकी मार्ग खड्ड्यात हरवला आहे.त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.म्हणून अवजड वाहतूक दारानी मनाई वस्ती मार्गावरून आपला तांडा वळवला होता.तो एकेरी मार्ग आणि त्यावर अवजड व हलकी वाहने मोठ्या प्रमाणावर धावू लागल्याने
त्याची वाट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे संतापून संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन त्या ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती.त्यासाठी अवजड वाहतूक बंदीसाठी अडथळे निर्माण करण्यात आले होते.मात्र जुना नागपूर मार्गावरील पुलाची दुरुस्तीसाठी प्राधिकरण अधिकाऱ्यांना काही सवड मिळत नव्हती.त्यांनी हा पुलावरील वाहतूक बंद करण्याची जेवढी घाई केली तेवढी दुरुस्तीसाठी दिरंगाई केल्याने वाहतूकदारांत आणि प्रवाशांत संताप निर्माण झाला होता.आणि लोकप्रतिनिधींना त्याकडे पाहायला वेळ मिळत नव्हता.मात्र आता त्यांना ऐन धोंड्यात सवड मिळाल्याने प्रवाशी आणि संवत्सर ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.आता या रस्त्यावरील पूल आगामी १५ जून पर्यंत पूर्ण करण्याचे फर्मान आ.आशुतोष काळे यांनी काढल्याने ते ते पाळणार का यक्ष प्रश्न उरला आहे.त्यामुळे आता प्रवासी आणि ग्रामस्थांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.



