जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

गंगागिरीजी महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा.देशमुख यांना दोन सुवर्ण पदके

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे दिनांक ९ व १० ऑक्टोंबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत.आगामी नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“प्रा.देशमुख यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.त्यांची ही कामगिरी महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे,महाविद्यालय विकास समिती सदस्य आदींनी अभिनंदन केले आहे”-डॉ.एस.आर.थोपटे,प्राचार्य,श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालय,कोपरगाव.

औरंगाबाद येथे दिनांक ९ व १० ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही प्रकारात स्पर्धा संपन्न झाल्या आहेत.त्यावेळी त्यांनी हि कामगिरी केली आहे.त्यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयांत त्यांचा नुकताच सत्कार आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे हे होते.

प्रा. देशमुख यांच्या यशस्वी कामगिरीने बद्दल प्राचार्य थोपटे यांनी प्रा.देशमुख यांचे कौतुक करताना,”प्रा.देशमुख यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.त्यांची ही कामगिरी महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे,महाविद्यालय विकास समिती सदस्य रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समिती सदस्य आ.काळे आदिंसह महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे सांगितले आहे.

या निमित महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर सेवकांनीही प्रा.देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रसंगी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,डॉ.विजय निकम कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,रजिस्ट्रार सुनील ठोंबरे,अधीक्षक सुनील गोसावी आदिंसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close