जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव बाजार समितीचा रणसंग्राम सुरु,निवडणूक याद्या अंतिम टप्यात !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदतवाढ नुकतीच संपली असून याबाबत जबाबदारी सरकारच्या सहकारी निवडणूक प्राधिकरणावर निवडणूक विभागाने सोपवली असून त्यांनी मतदार याद्या बनविण्याचे आदेश नुकतेच पारित केले असून याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आता कोपरगाव तालुका या निवडणुकींनी ढवळून निघणार आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव बाजार समितीची नुकतीच मुदत संपलेले सभापती संभाजी रक्ताटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आमची मुदत संपलेली नसताना आमचा कालावधी राजकीय कारणातून गोठविण्यात आला असून आमच्या पदाधिकारी व संचालक मंडळावर अन्याय झाला असल्याही भावना बोलून दाखवली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सन २०१५ मध्ये संपन्न झाली होती.त्या वेळी माजी मंत्री शंकरारव कोल्हे,माजी आ.अशोक काळे,राजेश परजणे,व तत्कालीन स्वाभिमानी विकास आघाडी,व विजय वहाडणे गट यांनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती.त्यात कोल्हे गट व काळे गटास समसमान ०५ जागांचे वाटप करण्यात आले होते.तर परजणे व स्वाभिमानी विकास आघाडीस प्रत्येकी दोन,व वहाडणे भाजप गटास एक जागा देण्यात आल्या होत्या.याखेरीज व्यापारी दोन व एक हमाल पंचायत अशा अठरा जागांसाठी हि निवडणूक संपन्न झाली होती.

दरम्यान या संचालक मंडळाची मुदत दि.३० ऑक्टोबर रोजी संपली होती.मात्र देशभरात कोरोना विषाणूची साथ आल्याने या निवडणूका केंद्र व राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या.दरम्यान संचालक मंडळाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करून मुदत वाढ मागितली होती.तिला न्यायालयाने एप्रिल ते १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मंजुरी दिली होती.मात्र पुन्हा यावर राजकीय खेळी झाली होती.व त्यात मुदत संपण्याआधीच १५ सप्टेंबर रोजी प्रशासक नेमण्यात आले होते.त्याला कारण बाजार समिती संचालक मंडळाने एक चासनळी येथे मंजूर उपबाजार हा मंजूर झाल्याने व त्या नंतर मोर्विस व धामोरी येथील कार्यकर्त्यांनी हा उपबाजार त्यांच्या गावात सुरु करण्याचा अट्टाहास धरल्याने यातून एका राजकीय नेत्यांची खप्पा मर्जी संचालक मंडळावर झाली होती.त्यातून राजकीय विधानसभेत नेतृत्व करणारा नेता दुखावला गेला असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे त्यातून राजकीय खेळी होऊन मुदत पूर्व संचालक मंडळास निरोप घेण्याचा अनास्था प्रसंग ओढवला होता.त्यामुळे संचालक मंडळास जरा दुःखद अंतकरणाने बाजार समितीचा निरोप घ्यावा लागला होता.

दरम्यान राज्य सरकारने कोरोना साथ नियंत्रणात आल्याने आपल्या मुदत वाढ मिळालेल्या निवडणूक घेण्याचा निर्णय नुकताच एका आदेशाने घेतला होता.त्यामुळे राज्याच्या सहकार विभागाने दि.३० सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केला होता.त्यानुसार दि.०६ ऑक्टोबर रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश देऊन मुदत संपलेल्या बाजार समितीच्या निवडणुका (उच्च न्यायालयात प्रलंबित दावे वगळता ) दि.२३ ऑक्टोबर नंतर घेण्याचे जाहीर केले होते.ज्या बाजार समित्यांची निवडणूक दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी अथवा त्या आधी संपली आहे.वा ज्या बाजार समित्यांवर दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रशासक नियुक्त झाले आहे.अशा बाजार समित्यांच्या निवडणूतिच्या अंतिम मतदार याद्या दि.३० सप्टेंबर २०२१ या अहर्ता दिनांकावर घेण्याचे निर्देशीत केले आहे.त्यानुसार कोपरगाव बाजार समितीच्या याद्या या दि.२० ऑक्टोबर २०२१ पर्यंत सादर करण्याचे निर्देशीत केले आहे.त्यानुसार हे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान या निवडणुकीत किमान १० आर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकंऱ्या ऐवजी बाजार समिती कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या कृषी पतसंस्था,बहुउद्देशीय सहकारी संस्था,व ग्रामपंचायत सदस्य यांना मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close