जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

…ही शाळा क्रिकेट मध्ये अजिंक्य

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   जिल्हा क्रीडा अधिकारी,अ.नगर व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल,कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहे.या स्पर्धेत लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन करत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघाने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा अंतिम सामन्यात नऊ धावांनी पराभवाची धूळ चारत  तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे.

     

“गौतमचा सदर विजयी संघ १९ सप्टेंबर रोजी आत्मा मालिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार आहे”-नुर शेख,प्राचार्य,गौतम पब्लिक स्कूल.

  स्पर्धेतील पहिलाच सामना बीटीएम स्कूल संघाविरुद्ध विरुद्ध टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकत गौतमच्या संघाने विजयी दौड सुरू केली.कॉर्टर फायनल मध्ये गौतमच्या संघाने केबीपी विद्यालय संघाचा १९ धावांनी पराभव केला; तर उपांत्यपूर्व सामन्यात आत्मा मलिक स्कूल संघाचा ०८ विकेट्सने पराभव करून अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला.अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाला गौतम च्या संघाने दिलेल्या आव्हाना पर्यंत पोहोचता देखील आले नाही.गौतमच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संजीवनीचा संघ अवघ्या २०  धावात गारद झाल्याने गौतमच्या संघाने विजेतेपद पटकावले.
गौतमच्या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार अजय मच्छिंद्र बेंडके व उप-कर्णधार मयूर भैय्यासाहेब पाटील यांनी केले.स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मोहित पाटील,सोहम आगळे,युवराज बेंडके,उत्कृष्ट फलंदाज म्हणून नैतिक पाटील,मयूर पाटील,अजय बेंडके,युवराज बेंडके,अर्जुन भोये,अभिराज देवरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आदी पटेल,सुशांत पाटील,संस्कार थेटे,यज्ञेश पवार,यश पाटील, विप्लाव पवार,कार्तिक बेंडके,गोपाल मंगरुळे यांनी चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले.गौतमच्या वस्तीगृहातील हे निवासी विद्यार्थी राज्यातील अ.नगर,नाशिक,संभाजीनगर,पुणे,मुंबई अशा विविध जिल्ह्यातील आहे.

गौतमचा सदर विजयी संघ १९ सप्टेंबर  रोजी आत्मा मालिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. विजयी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद व दानिश शेख यांनी प्रशिक्षण दिले.संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,संस्था विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,संस्था सचिव चैताली काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी आदींनी विजयी संघाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close