जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


धामोरी-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील भैरवनाथ मंदिर व मारुती मंदिर परिसर प्रांगणात सालाबादप्रमाणे याही वर्षी आजपासुन शनिवार दि.२९ ऑगष्ट  पासुन ते ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महाउत्सव आहे,ज्यामध्ये सात दिवस अहोरात्र विठू नामाचा गजर केला जातो.सात दिवस सलग नामस्मरण,भजन आणि कीर्तनामुळे ईश्वरी चेतना जागृत होते आणि मन शुद्ध होते.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांच्या वाङ्मयाचा आणि विचारांचा प्रसार समाजात होतो.त्यामुळे याचे गावे आयोजन होत असते.कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथेही या सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

    अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महाउत्सव आहे,ज्यामध्ये सात दिवस अहोरात्र विठू नामाचा गजर केला जातो.सात दिवस सलग नामस्मरण,भजन आणि कीर्तनामुळे ईश्वरी चेतना जागृत होते आणि मन शुद्ध होते.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांच्या वाङ्मयाचा आणि विचारांचा प्रसार समाजात होतो.शिवाय गावोगावी किंवा तीर्थक्षेत्रांवर एकत्र येऊन सर्व जाती-धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात,ज्यामुळे सामाजिक सलोखा वाढतो.प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सत्कार्याची प्रेरणा व नैतिक आचरणाचे धडे मिळतात.त्यामुळे गावोगाव सप्ताहाची परंपरा गेली अनेक शतके अद्याप सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातील धामोरी त्याला अपवाद नाही.या ठिकाणी या धार्मिक कार्याची सुरुवात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

  या सप्ताह सोहळा दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४.३० ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सोहळा,संध्याकाळी ७ ते ९ हरिकिर्तन सोहळा,रात्री सामुदायीक हरिजागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या सप्ताह कालखंडात दि.२९ रोजी ह.भ.प.प्रल्हाद महाराज दाभाडे. (बोकटे) दि.३० रोजी ह.भ.प  नामदेव महाराज खुळे (वडांगळी),दि.३१ रोजी ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव (सटाणा),दि.१ सप्टेबर रोजी ह.भ.प.विकास महाराज शिंदे (मुखेड),दि.२ सप्टेंबर रोजी ह.भ.प.समाधान महाराज पाटिल.(वंजारवाडी) दि.३ रोजी ह.भ.प. निलेश महाराज पवार (लासलगाव),दि.४ रोजी ह.भ.प.प्रसाद महाराज भागवत.(९ वे वंशज बाबा भागवत महाराज श्रीक्षेत्र देवपूर) यांची किर्तनसेवा रात्री १० ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे.  

  दरम्यान शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी १० ते १२ या वेळेत जळगाव येथील श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भागवताचार्य देवगोपाल महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तनाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल.तरी सर्व धामोरी व धामोरी परिसरातील मायगाव देवी,सांगवी भुसार, मोर्विस,चास नळी,शिरवाडे वाकद येथील भावीकांनी या सप्ताह सोहळा कार्यकमात उपस्थित रहावे असे आवाहन धामोरी येथील समस्त ग्रामस्थ,समस्त भजनी मंडळ,समस्त तरुण युवक मंडळ व समस्त सप्ताह समितीने केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close