धार्मिक
साई चरणी १८.८४ लाखांची छत्री

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर अमेरिका स्थित साईभक्त के.चंद्रशेखर यांनी श्री साईबाबांच्या चरणी ०८ किलो ९३३ ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री भक्तिभावाने अर्पण केली आहे.या छत्रीचे देणगी मूल्य रुपये १८ लाख ८४ हजार ८६३ इतके असल्याची माहिती साई संस्थांने दिली आहे.

साई चरणी अर्पण करण्यात आलेली छत्री आज श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर माध्यान्ह आरतीपूर्वी प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त के.चंद्रशेखर यांचा सत्कार केला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946



