जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

उमेश धुमाळ यांचे धर्मपत्नीचे निधन!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर परिसरातील रहिवासी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांच्या धर्मपत्नी संध्याताई उमेश धुमाळ (वय-६३)यांचे आज दुपारी २.३० वाजता नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,दोन नातवंडे असा परिवार आहे.गेल्या अनेक दिवसापासून अल्पशा आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्यावर आज रात्री १० वाजता कोपरगाव येथील गोदातीरी अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.संध्याताई धुमाळ यांचे छायाचित्र.

 

  स्व.संध्याताई धुमाळ या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कर्मवीरनगर आणि कोपरगाव शहरात परिचित होत्या.त्यांचा कर्मवीरनगर परिसरात असलेल्या धार्मिक कार्यात सहभाग असायचा.त्यांना काही दिवसापूर्वी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचेवर नाशिक येथे उपचार सूरु होते.मात्र त्यांचेवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.उपचार सुरू असतानाच आज दुपारी २.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या पश्चात सुजय धुमाळ आणि सूरज धुमाळ ही दोन मुले आहेत.

  त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,आ.आशुतोष काळे,आ.विवेक कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close