जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

इलेक्ट्रीक ट्रॅक्टरद्वारे शेती हे क्रांतिकारक पाऊल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   इंधनाच्या दरात सातत्यांने वाढ होत असल्यांने शेती मशागतीच्या तत्सम खर्चात दिवसेंदिवस शेतक-यांसमोर नवनविन प्रश्न निर्माण होत आहे त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पर्यावरण पूरक आधुनिक तंत्राच्या वापराला सर्वोच्च प्राधान्य देत इलेक्ट्रीक ट्रॅक्टरद्वारे पर्यावरणपुरक शेतीसाठी पहिले पाउल टाकले असल्याची माहिती आ.विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी या ट्रॅक्टरची तांत्रीक वैशिष्टये व कार्यपध्दती जाणुन घेतली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
  

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानातुन आत्मनिर्भर विकसीत भारतात पर्यावरणपुरक उपक्रमांना सातत्यांने प्राधान्य दिले असुन त्यातुनच या ट्रॅक्टरची निर्मीती करण्यांत आली आहे”-प्रकाश गिरी,मॉन्ट्रा इलेक्ट्रीकचे महाराष्ट्र विभागीय प्रमुख.

    पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ही काळाची गरज आहे.पारंपारिक डिझेल ट्रॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढतो.या समस्येवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा एक उत्तम आणि शाश्वत पर्याय मानला जात आहे.इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने कार्बन उत्सर्जन शून्य होते.हवा शुद्ध राहून इंधनाची बचत होण्यास मदत होत आहे.डिझेलच्या वाढत्या किमतींपासून कायमची सुटका होते.या ट्रॅक्टरला इंजिन नसल्यामुळे ऑइल बदलणे किंवा इतर दुरुस्तीचा खर्च वाचतो.हे ट्रॅक्टर अतिशय शांत चालतात.शेतात काम करताना त्रास होत नाही.इलेक्ट्रिक मोटरमुळे सुरुवातीलाच जास्त ताकद मिळते.जड कामांसाठी हे फायदेशीर ठरते.शेतकरी स्वतःच्या शेतातील सौर ऊर्जेवर हे ट्रॅक्टर चार्ज करू शकत असल्याने त्याला उज्ज्वल भवितव्य असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याने याबाबत पाऊल उचलले आहे.त्यासाठी माँत्रा कंपनीने शेती व अन्य कामासाठी ४५ एच.पी.क्षमतेच्या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरची नव्यांने निर्मिती केली असुन राज्यात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सदर ट्रॅक्टरची खरेदी केली त्याची पहिली प्रात्याक्षीक राईड श्रीसाईबाबांच्या शिर्डी येथे नुकतीच घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,खाते प्रमुख,उपखातेप्रमुख,शेतकी विभागाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी मांडता मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचे राज्याचे विभागप्रमुख प्रकाश गिरी,टी.एम.सेलचे बलराम मूर्ती आणि वितरण अधिकारी चैतन्य कापसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अमेरिका इस्रायल विरूध्द इराणच्या युध्दात आपल्याला पेट्रोल,डिझेल,गॅस संदर्भात मोठया प्रमाणांत अडचणींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करताना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागले.या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या सहायांने शेतीतील मशागतीची कामे केली तर पर्यावरणाची हानी कमी होते,वेळेबरोबरच इंधन खर्चात मोठी बचत होते.त्यामुळे शेतक-यांनी इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या सहायांने शेतीचे तंत्र अवलंबवावे व शेती खर्चात बचत करावी.भविष्यात शेतीमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढेल,तेव्हा शेतकऱ्यांनी नव्या बदलाला सामोरे जावे असेही ते शेवटी म्हणांले.

   तर विक्री विभागाचे बलराम मुर्ती म्हणाले की,”शेतीतील दैनंदिन कामासाठी मात्रा इलेक्ट्रीक ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर दोन तासांच्या सिंगल चार्जमध्ये १०० किलोमिटर प्रवासाची क्षमता असुन त्याच्या वापरातुन डिझेलच्या खर्चात मोठया प्रमाणांत बचत होते.यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी या ट्रॅक्टरची तांत्रीक वैशिष्टये व कार्यपध्दती जाणुन घेतली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close