जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

…या बस आगारात नवीन बस दाखल,प्रवाशांत समाधान!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

   कोपरगावकरांच्या सार्वजनिक परिवहन सेवेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून,आ.विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव एसटी आगारासाठी १५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस मंजूर झाल्या असल्याचा दावा त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने केला आहे.त्यातील बारा बस उपलब्ध झाल्या असून तीन बस देखील येत्या काही दिवसात आगारात उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोपरगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या एम.एच.14 एन.पी. 6812 व एम.एच.14 एन.पी.6813 या दोन बस आज उपलब्ध झाल्या आहेत त्याचे छायाचित्र दिसत आहे.

  वर्तमानात महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बसेस आयुर्मान संपल्यामुळे कमी झाल्या असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी युद्धपातळीवर नवीन बसेसची बांधणी आणि खरेदी प्रक्रिया सुरू आहे.पूर्वी १६ हजार पेक्षा जास्त असलेला एसटीचा ताफा जुन्या बसेस कालबाह्य झाल्याने सुमारे १४ हजार ७०० पर्यंत खाली आला आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त झालेल्या सुमारे ५ हजार जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने भंगारात काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्या अंतर्गत या बस उपलब्ध झाल्या असल्याचे मानले जात आहे.याबाबत आ.आशुतोष काळे यांच्या बातम्या येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जुन्या बसेस भंगारात काढल्यामुळे निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने ८ हजार ३०० हून अधिक नवीन बसेस तयार करून दाखल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सध्या महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बसेस आयुर्मान संपल्यामुळे कमी झाल्या असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी युद्धपातळीवर नवीन बसेसची बांधणी आणि खरेदी प्रक्रिया सुरू आहे.पूर्वी १६ हजार पेक्षा जास्त असलेला एसटीचा ताफा जुन्या बसेस कालबाह्य झाल्याने सुमारे १४ हजार ७०० पर्यंत खाली आला आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त झालेल्या सुमारे ५ हजार जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने भंगारात काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.बसेसच्या कमतरतेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक फेऱ्या रद्द होणे किंवा जुन्या बसेस वाटेतच बंद पडणे अशा समस्या निर्माण झाल्या असल्याने राज्यात राज्य परिवहन मंडळाची मोठी दैना झाली होती.त्याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत होता.त्यामुळे याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन कृती आराखडा तयार करून या बस पाठवल्या आहेत.मंजूर झालेल्या १५ बसपैकी १२ नवीन बस कोपरगाव आगारात दाखल झाल्या असून,त्या प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आल्या आहेत.आणखी २ बस सायंकाळपर्यंत आगारात दाखल होणार असून,उर्वरित १ बस पुढील चार ते पाच दिवसांत उपलब्ध होणार आहे.त्यामुळे लवकरच कोपरगाव आगाराच्या ताफ्यात सर्व १५ नवीन बस दाखल होतील.

   कोपरगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिक,विद्यार्थी,महिला,नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी.बससेवा ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची सुविधा आहे.प्रवाशांची वाढती संख्या,उपलब्ध बसची गरज आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आ.विवेक कोल्हे यांनी लावून धरली असल्याचा त्यांचा दावा आहे.

  दरम्यान या सहकार्याबद्दल आ.कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close