कृषी विभाग
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे -मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात सरकारने कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क वाढवले असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात तीन महिने पूर्ण होतील परंतु अद्यापही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे.अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना दिलासा मिळू शकत असतांना सरकारच्या निर्णयाने खोडा बसला आहे सदर कांदा निर्यातीवर शुल्क रद्द होणे गरजेचे आहे त्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.
कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आढावा घेतला असून त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी पावले उचलली आहेत.निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे”-आ.आशुतोष काळे.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे ‘मोफत सर्व रोग निदान शिबिर’आयोजित केले होते त्याचे उदघाटन प्रसंगी आ.काळे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे होत्या.
सदर प्रसंगी कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक रामदास केकाण,राजेंद्र निकोले,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,संचालक नानासाहेब निकम,संदीप शिंदे,संजय संवत्सरकर,माजी जि.प.सदस्या विमल आगवण,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक आप्पासाहेब निकम,गौतम बँकेचे माजी संचालक अनिल महाले,गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे,शिरसगावच्या सरपंच मंगल उकिरडे,तीळवणीचे सरपंच गोविंद पगारे,सांडू पठाण,माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार,मायादेवी खरे,रेखा जगताप,अशोक उकिरडे,कृष्णा मलिक,राहुल गायकवाड आदिसंह संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविल्यास वाढदिवसाचे खरे खुरे समाधान मिळते.अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांचे वेळीच निदान होवून पुढे उद्भवणारा धोका टाळता येतो.या शिबिराच्या माध्यमातून श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून मेंदूचे आजार,युरो सर्जरी,हृदय विकार,जनरल सर्जरी,स्त्रियांचे आजार,हाडांचे आजार,कॅन्सर आदी आजारांची मोफत तपासणी,मार्गदर्शन व ज्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांची गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हॉस्पिटलच आपल्या दारी आले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारभारी आगवण यांनी केले सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी तर अप्पासाहेब निकम यांनी आभार मानले आहे.