Uncategorized
लोकपाल नियुक्ती अण्णांच्या आंदोलनाचे मोठे यश-रामदास घावटे
जवळा (प्रतिनिधी )-लोकप्रतिनिधी व लोकसेवक यांच्या
भ्रष्टाच्यारावर नियंत्रन आणणारा कठोर असा लोकपाल कायदा केंद्र सरकारने पाच वर्षापुर्वी तयार केला होता., परंतु लोकपाल शोध समितीतील विरोधी पक्षनेतेपदाचे पद रिक्त असल्याचे कारण देत केंद्र सरकार याबाबत टाळाटाळ करत होते . त्यामुळे ही नियुक्ती रखडली होती. पुढे सर्वोच्च न्यायालयात याबाबत जनहीत याचिका दाखल केली होती . यावर गेल्या वर्षभरापासुन सुनावणी चालु होती. न्यायालयाने तातडीने समिती गठीत करून लोकपालची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते.
त्यानुसार लोकपालाची निवड करून नियुक्ती करण्यात आली आहे . माजी न्यायमुर्ती
पी.सी. घोष यांना राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी शनिवारी शपथ दिली .
जेष्ट समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी गेल्या दहा वर्षांपासुन या कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा व आंदोलने केली होती. सन २०११ चे ऐतिहासीक आंदोलन देशातील सर्वात मोठे आंदोलन ठरले होते . लोकपाल नियुक्ती हे अण्णांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. लोकपाल निवडीचे आम्ही आंदोलनातील सर्व कार्यकर्ते स्वागत करतो असे आंदोलनाचे कार्यकर्ते रामदास घावटे यांनी सांगितले.