कोपरगाव तालुका
कुकडी नदीला आवर्तन सुटले,,, कुकडी कालव्यातून कधी?
कालव्यातून त्वरित पाणी सोडण्याची पारनेरकरांचीमागणी,,
जवळा (प्रतिनिधी)-पारनेर व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांची नळपाणीपुरवठा योजना पाणीटंचाईमुळे ठप्प झाली असून आज दि. १९ रोजी प्रत्यक्षात कुकडी नदीला पाणी आल्याने येत्या दोन दिवसांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे. गेले एक महिन्यापासून या भागात विषेश करुन पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील दहा ते बारा गावात तसेच शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी बेट भागातील गावे या कुकडी नदीच्या पाण्याचा सिंचना खाली आल्याने फायदा होतो कुकडी नदीला पाणी सोडल्याने काही प्रमाणात का होईना पाणी टंचाई दूर होणार आहे. शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना भेटून या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची माहीती देत कुकडी नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पाणी न सुटल्यास या भागातील माणसे व जनावरांच्या समस्येमध्ये वाढ होऊन समाजजीवन विस्कळीत होईल. सध्या कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणामध्ये पाणी असूनही जिवणाश्यक बाबींसाठी पाणी सुटत नाही यासाठी जनतेत मोठय़ा प्रमाणात रोष असून या रोषाचे रूपांतर आंदोलनात झाल्यास संबधीतांना हे आंदोलनाचा फटका बसेल यासाठी कुकडी नदीला पाणी सोडणे हा एकमेव पर्याय असल्याचे मा. आमदार गावडे यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले होते. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेउन पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना कुकडी नदीला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने जवळपास पारनेर व शिरूर तालुक्यातील बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास सुटणार आहे.