जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मोकाट कुत्रांचा बालकांवर हल्ला,कोपरगावात तीन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगर परिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यात आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास संजयनगर येथील हसनेन इम्रान तांबोळी (वय-६),हमजा जावेद अत्तार (वय-३),रा.आयेशा कॉलनी तर फैजल मोहसीन शेख,(वय-४),रा.हनुमाननगर (हा मामाकडे आला होता)आदींवर त्यांच्या राहात्या घराजवळ मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून त्यात हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून सदर सर्व खर्च पालिका प्रशासनाने करावी अशी मागणी त्यांच्या पालकांनी केला आहे.

संजयनगर,सुभाषनगर आदी भागात मोकाट कुत्री,गाढव,डुकरे आदींचा मोठया प्रमाणावर उपद्रव असल्याचा आरोप आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केला असून याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आपण आंदोलन करून असा इशारा त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

दरम्यान एका माहितीनुसार या भागात अवैध गोवंश कत्तल मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने व त्यातील अनावश्यक मांस या अवैध व्यवसायात गुंतलेले नागरिक या खंदक नाल्याच्या परिसरात टाकत असतात.परिणामस्वरूप या भागात मोकाट कुत्र्यांना (सुग्रास) खाद्य मिळत असल्याने यांचा उपद्रव सुरु असतो.त्याचा बंदोबस्त कोण करणार असा सवाल एका सुज्ञ नागरिकाने विचारला आहे.त्यामुळे यावर पालिका व पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे हि महत्वाचे ठरणार आहे.तरच मूळ प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या संजयनगर परिसरात मोकाट कुत्री आणि जनावरांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे.सदर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी मोकाट कुत्री बसत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो.आतापर्यंत काही जणांना या कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे.कोपरगाव नगरपालिकेचे मोकाट जनावर पकडणारे पथक कुत्र्यांना एका ठिकाणाहून पकडून दुसरीकडे सोडून देते.त्यामुळे एका भागातील मोकाट कुत्र्यांची समस्या सुटते तर दुसऱ्या भागात ती नव्याने निर्माण होते.यावर नगरपालिका प्रशासनाने तोडका काढणे गरजेचे आहे.मात्र यावर तोडगा निघताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संजयनगर,सुभाषनगर आदी भागात मोकाट कुत्री,गाढव,डुकरे आदींचा मोठया प्रमाणावर उपद्रव असल्याचा आरोप आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केला असून याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आपण आंदोलन करून असा इशारा त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

दरम्यान या घटनेने मोठया आरडाओरडा झाल्याने नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्या मुळे पुढील अनर्थ टळला आहे.तो पर्यंत यातील दोन बालकांच्या शरीराची या कुत्र्यानी चाळन करून टाकली असल्याचे निदर्शनास आले आहे.एकाच्या चेहऱ्याची अक्षरशः चिरफाड केल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.व या मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.यावर कारवाई केली नाही तर नागरिक आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत भाजप कोल्हे गटाचे कार्यकर्ते पराग संधान,माजी नगरसेवक बबलू वाणी,कैलास जाधव,अल्ताफ कुरेशी आदींनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेतली असून सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close