निधन वार्ता
सुमनबाई नेहे यांचे निधन

न्यूजसेव
लोहगाव(वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव (प्रवरानगर)येथील गं.भा.सुमनबाई परसराम नेहे (वय-७२) नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,सून नातू,नातवंडे,नात सुना,जावई असा मोठा परिवार आहे.

धनंजय नेहे व प्रवीण नेहे यांच्या त्या आजी व पत्रकार कोंडीराम नेहे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर त्यांच्या वस्तीवरच शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.