जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात तरुणाचा खून,चार आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोहेगाव येथील बाजारतळा जवळील डोऱ्हाळे रोड लगत असलेल्या बंधा-यात बाजारतळावर एक जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आल्यानंतर शिर्डी पोलिसानी तातडीने हालचाल करून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्याबाबत पोलिसांच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

शिर्डी पोलिसांनी पोहेगाव येथे घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेऊन मयताची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला होता.या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भा.द.वि.कलम ३०२,२०१ गुन्हा दाखल करुन तपास सुरू करून काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असून कुठलाही धागादोरा व पुरावा नसताना अल्पावधीत आरोपी जेरबंद केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दी आठवडे बाजारतळा जवळील डोऱ्हाळे रोड लगत असलेल्या दगडी बंधा-यात एक जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता त्यामुळे पोहेगाव आणि परिसरात खळबळ उडाली होती.पोलिसांपुढे सदर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले हॊते.

शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेऊन मयताची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला होता.या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भा.द.वि.कलम ३०२,२०१ गुन्हा दाखल करुन तपास सुरू करून काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असून कुठलाही धागादोरा व पुरावा नसताना अतिशय बारकाईने सर्व कौशल्य पणाला लावून अवघ्या काही तासांतच आरोपींना पकडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

लाखो साईभक्त शिर्डी येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला आलेले असताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नसताना या खुनामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशीच या खुनामुळे एक प्रकारे पोलिसांना गुन्हेगारांनी सलामीतर दिली नाही ना अशी चर्चा नागरिकांत सुरू असताना पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणत जनतेला पोलीस देखील काय करु शकतात याचा प्रत्यय आणुन दिला आहे यातील चारही आरोपी २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत मोबाईल हे किरकोळ व मयताच्या खुनाचे कारण असले तरी आणखी काही कारणे आहेत का ? याचा देखील तपास केला जात आहे.

याबाबत अधिकची माहिती देताना तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,”मयत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्यांच्या वर गंभीर गुन्हे दाखल आहेत.सोमनाथ शंकर कल्लारे (वय-३३) रा.रांजणगाव ता. राहता यांच्या मित्रासमावेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खटकळी येथे ३१ डिसेबरच्या रात्री दारु पार्टी करत होता.दरम्यान मयताने एकाचा मोबाईल घेऊन मारहाण केली तो मित्र निघुन गेला होता.मात्र इतर मित्रांनी सांगितले की त्यास का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला तेव्हा त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्यात आला होता.व दि.३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह दुचाकी वरुन गोणीत बांधुन पोहेगाव येथे फेकून देण्यात आला होता.

या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय-२२),सचिन उत्तम पवार (वय-२२),प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय २२), सिध्दांत प्रमोद निकाळे (वय-२०) सर्व राहणार राहता या चौघांना शिताफीने पकडण्यात आले आहे.दरम्यान या गुंह्यातील आणखी संशयिताचा शोध सुरू आहे.या खुनात जो मयत आहे त्यांच्यावर लोणी राहता पोलीस ठाण्यात ११ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे,संभाजी पाटील,अंजय अंधारे,नितीन शेलार,सुर्यकांत ढाके,संदिप गडाख,राजवीर बिरदवडे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close