जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात सेनेच्या ‘बनावट प्रतिज्ञापत्र चौकशी’त काय निष्पन्न ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मुंबई वांद्रे परिसरात उद्धव शिवसेनेची बनावट प्रतिज्ञापत्रे सापडल्याच्या प्रकरणी कोपरगाव शहरात मुंबई गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसापासून ठाण मांडून असून त्यांनी दोन दिवसात १५० प्रतिज्ञापत्रांची पडताळणी केली असून त्यात अद्याप तरी काही आक्षेपार्ह सापडले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“आपण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन दिवसात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सुमारे १५० प्रतिज्ञा पत्रांची पडताळणी संबंधित कार्यकर्त्याना समक्ष बोलावून केली आहे.त्यासाठी एक अधिकारी व दोन लेखनिक आदी कार्यरत आहेत.मात्र अद्याप तरी त्यात काही आक्षेपार्ह आढळले नाही”-मधुकर सानप,पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा मुंबई.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने धाव घेत पक्षावर दावा केला होता.शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा जिकरीचे प्रयत्न सुरू होता.निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत.मात्र वांद्रे परिसरात ४ हजार ६८३ बनावट प्रतिज्ञापत्र सापडले असल्याने व त्या ठिकाणी सलग दोन दिवस बनावट प्रतिज्ञापत्र बनविण्याचे काम सुरु असल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी निर्मलनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या प्रकरणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरु केला आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके कोल्हापूर,पालघर,अ.नगर आणि नाशिक येथे दाखल झाली आहेत.पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात याचा तपास करण्यात येत आहे. ठाकरेंच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे साडेचार हजार शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.

त्यानंतर या बनावट प्रतिज्ञापत्राचा तपास मुंबई पोलिसांच्या गु्न्हे अन्वेशषण विभागाने सुरू केला आहे.मुंबई गुन्हे शाखेची चार पथके कोल्हापूर,पालघर,अ.नगर,नाशिक येथे दाखल झाली आहेत.त्यातील एक पथक काल सकाळी कोपरगाव शहरात दाखल झाले आहे.त्याचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मधुकर सानप हे करीत आहेत.

त्याच्याशी आमच्या प्रतिनिधीने आज मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सानप यांचेशी आज सायंकाळी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण दोन दिवसात सुमारे १५० प्रतिज्ञा पत्रांची पडताळणी संबंधित कार्यकर्त्याना समक्ष बोलावून केली आहे.त्यासाठी एक अधिकारी व दोन लेखनिक आदी कार्यरत आहेत.मात्र अद्याप तरी त्यात काही आक्षेपार्ह आढळले नाही” असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेला तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीही या अधिकाऱ्यांच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.व शहरातून प्रारंभी ७७१ प्रतींज्ञापत्र भरून घेतले होते.व नंतर २०० प्रतिज्ञापत्र भरून घेतले असल्याचे सांगितले आहे.यात परस्पर दिलेल्या पत्रिज्ञापत्रांचा समावेश नाही.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दसऱ्याच्या आधी २०० प्रतिज्ञापत्र भरून दिले होते त्या नंतर १ हजार भरून दिले असल्याचे म्हटले आहे.तर दुसऱ्या खा.लोखंडे गटाने अंदाजे १ हजार प्रतींज्ञापत्र भरून दिले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.तालुक्यातून एकूण अंदाजे २ हजार ५०० ते ३ हजार प्रतिज्ञापत्र भरून दिले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आर.बी.थोरात यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मेळाव्याला जाण्यापुवी केवळ चार ते पाच प्रतिज्ञापत्र भरून दिले व प्रवेश केल्याचे मान्य केले असून उर्वरित १५० प्रवेश शिंदे सेनेत होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे या बनावट पत्रिज्ञापत्रांचा कोपरगावात तरी अद्याप सुगावा लागलेला दिसत नाही उद्या होणाऱ्या चौकशीत काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close