जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘त्या’खुनात आणखी एक आरोपी अटक,कोपरगावातील खुनाची घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी हर्षदा बानकर (वय-१७) हिची हत्या करून तिची आरोपी बहिण सृष्टी बानकर हिने आपला खंडाळा ता.श्रीरामपूर येथील प्रियकर आकाश राजेंद्र कांगुणे याचे सोबत न्यायालयीन विवाह केला होता.मात्र यात आरोपी बहिणीवरच आधी गुन्हा दाखल असताना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मुलीचा नवरा आकाश कांगुणे (वय-२१) यास सह आरोपी केले असल्याची माहिती उघड झाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

कोपरगाव शहर पोलिसांनी यात मयत मुलीची बहीण कु.सृष्टी बानकर हिच्या विरुद्ध खून केल्याचा गुन्हा दखल केला होता.त्यानंतर नवनवीन खुलासे होत आहे.त्यात आता पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्यात आरोपी मुलीचा प्रियकर आकाश कांगुणे यास सह आरोपी बनवले असल्याचा नवीन खुलासा आला आहे.आता या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना २१ ऑक्टोबर पर्यंत न्यायिक कोठडीत पाठवले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत मुलगी स्व.हर्षदा नवनाथ बानकर (वय-१६) हिचे वडील हे समृद्धी महामार्गावर वाहनावर चालक असून घरात आई,एक मोठी बहीण,एक लहान भाऊ असा परिवार असून आहे.ती नगर-मनमाड रस्त्यालगत कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून त्याच रस्त्यावर त्यांचे साधे चहाचे हॉटेल होते.मयत मुलगी हि सोमैय्या महाविद्यालयात अकरावी शास्त्र विषयात शिक्षण घेत होती.मात्र तिने अज्ञात कारणाने दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० नंतर आपल्या राहत्या घरात पलंगाला दोरी अडकून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याचा दावा कुटूंबियांनी केला होता.
या प्रकरणी आधी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.६०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली होती.मात्र शव विच्छेदन अहवाल आल्यावर तो मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्या नंतर पोलीसांनी तातडीची कारवाई करून सदर आरोपी बहीण सृष्टी बानकर हिचे विरुद्ध भा.द.वि.कलम ३०२,२०१,१०९ अन्वये गुन्हा दखल केला होता.

दरम्यान या प्रकरणात मयत मुलीची थोरली बहीण या घटनेनंतर बेपत्ता झाली होती.प्रसिद्ध झालेल्या बातम्या नंतर मात्र ती आपल्या प्रियकरासमवेत पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून मुसक्या आवळल्या होत्या.व त्यांना पोलीस ठाण्यात आणून आरोपी बहीण व तिची आई व प्रियकर यांना पोलिसी हिसका दाखवला असता पहिल्या दिवशी त्या कबूल झाल्या नव्हत्या.मात्र सलग दुसऱ्या दिवशी तपास सुरु ठेवला होता.त्यात त्यांनी हि कबुली दिली होती.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांनी यात मयत मुलीची बहीण कु.सृष्टी बानकर (वय-१९) हिच्या विरुद्ध खून केल्याचा गुन्हा दखल केला होता.त्यानंतर नवनवीन खुलासे होत आहे.त्यात आता पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्यात आरोपी मुलीचा प्रियकर आकाश कांगुणे यास सह आरोपी बनवले असल्याचा नवीन खुलासा आला आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपी तरुणी सृष्टी बानकर व सह आरोपी कांगुणे यास नुकतेच हिला आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी तरुणी व तिचा प्रियकर यास २१ ऑक्टोबर पर्यंत न्यायीक कोठडी सुनावली असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.आरोपींच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पाहिले त्यांना अड्.व्ही.पी.ख्रिस्ते यांनी सहाय्य केले तर सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले आहे.

दरम्यान या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस उपविभागागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close