जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पिकपची दुचाकीस धडक,एक ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत त्याच गावातील रहिवासी असलेले इसम संजय गोसावी याच्या होंडा ऍक्टिव्हा हा स्कुटरला (क्रं.एम.एच.१७ सि.एफ.७२५५) मागून वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकपने जोराची धडक देऊन तो पसार झाला असून या अपघातात जखमी इसम जागीच ठार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सतिष छगनपुरी गोसावी यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे येसगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दि.२६ जून रोजी ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या मात्र आपल्या दुचाकीवर क्रमांक न टाकलेल्या होंडा ऍक्टिव्हा स्कुटरने येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने प्रवास करत होता.त्याच वेळी त्याच्या मागून भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकपने त्यास हॉटेल सातबारा समोर जोराची धडक देऊन त्यास जखमी केले होते.व त्यास दवाखान्यात उपचारार्थ दाखल न करता तो परस्पर पळून गेला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम सतिष गोसावी हे येसगाव येथील रहिवासी असून त्याचा शेती हा व्यवसाय आहे.त्यांचा मयत चुलत भाऊ संजय नानापूरी गोसावी हाही त्याच गावातील रहिवासी होता.तो दि.२६ जून रोजी ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या मात्र आपल्या दुचाकीवर क्रमांक न टाकलेल्या होंडा ऍक्टिव्हा स्कुटरने येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने प्रवास करत होता.त्याच वेळी त्याच्या मागून भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकपने त्यास हॉटेल सातबारा समोर जोराची धडक देऊन त्यास जखमी केले होते.व त्यास दवाखान्यात उपचारार्थ दाखल न करता तो परस्पर पळून गेला आहे.नजीकच्या नागरिकांनी त्यास उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा सुपर रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

घटनास्थळी असललेल्या नानासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या नातेवाईकांना दूरध्वनीवरून या अपघाताची खबर दिली होती.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील उपचारार्थ शिर्डी येथे रवाना केले होते.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित महिंद्रा पिकप विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६१/२०२२ भा.द.वि.कलम ३०४ सह अन्य कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close