जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत महेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस चांदेकसारे ह.मु.कोळगाव पाटी येथील अल्पसंख्याक समाजाच्या आरोपीने मुलीच्या भावास चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून पळवून नेले असल्याचा गुन्हा मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोळपेवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र

अपहरीत अल्पवयीन मुलगी हि फिर्यादिच्या कायदेशीर रखवालीत असताना चांदेकसारे येथील मूळ रहिवासी असलेल्या व ह.मु.कोळगाव पाटी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने दि.०१ जुलै रोजी दुपारी ०१ ते १.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या अल्पवयींन मुलीस फिर्यादीचे रखवालीतून अज्ञात कारणासाठी तिचे भावास चाकूचा धाक दाखवून व चापटीने मारहाण करून तिचे अपहरण केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात व शहरात अल्पवयीन मुली पळून वा पळवून नेण्याचा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे.अशीच घटना नुकतीच कोळपेवाडी येथे घडली आहे.याबाबत फिर्यादी महिलेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे.सदर फिर्यादी महिला हि कोळपेवाडी महेश्वर नगर येथील रहिवासी असून तिला एक मुलगा व एक अल्पवयीन मुलगी असा परिवार आहे.सदर मुलगी हि फिर्याईच्या कायदेशीर रखवालीत असताना चांदेकसारे येथील मूळ रहिवासी असलेल्या व ह.मु.कोळगाव पाटी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने दि.०१ जुलै रोजी दुपारी ०१ ते १.३० वाजेच्या सुमारास महेश्वर नगर येथून फिर्यादी महिलेच्या अल्पवयींन मुलीस फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी तिचे भावास चाकूचा धाक दाखवून व चापटीने मारहाण करून तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अपहरीत मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उप निरीक्षक धाकराव आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६०/२०२२ भा.द.वि.कलम ३६३,३४१,३२३,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार धाकराव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close