जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सत्ताधारी दोन गटात हाणामाऱ्या,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सत्ताधारी गटाच्या झावरे व जाधव या दोन गटात नुकतीच हाणामारी झाली असून एकमेकांच्या विरुद्ध गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.त्यात आरोपी म्हणून कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसऱ्या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनु संदीप दळवी,व निशांत राजेंद्र जाधव आदीं आठ जणांचा समावेश आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यात उत्तर नगर जिल्हा जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा तर दुसरा गट हा जिल्हा उपप्रमुख यांचा गट असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे भांडणे सोडविणे अभिप्रेत असताना नेमकी उलटी घटना घडली आहे.यात पूनम टॉकीज समोरील अतिक्रमण कारणीभूत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या दोन्ही नेत्यांनी एकमेकास बस स्थानकासमोरील दुकानासमोर उशिरा एकमेकांचा आमने-सामने उद्धार केल्याची माहिती हाती आली आहे.मात्र सदर ठिकाणी जमलेल्या समर्थकांनी धूम ठोकली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पहिल्या फिर्यादीत ऋषिकेश संदीप दळवी याने म्हटले आहे की,”आपण कोपरगाव शहरातील बाजारताळ येथील रहिवासी असून तेथे आपण आई उज्वला दळवी,वडील संदीप दळवी असे एकत्र राहतो व व्यापारी धर्मशाळे नजीक असलेली रसवंतीगृह चालवतो.मंगळावर दि.०१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपण आपल्या दुकानावर असताना आरोपी कैलास जाधव,त्यांची मुले सागर जाधव,विशाल जाधव,समीर जाधव यांनी मला शिवीगाळ करत,”काल रात्री आमचे सोबत भांडण का केले” असे म्हणत असताना आपण त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग मनात धरून त्यांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून,”पुन्हा आमचेशी भांडण करशील तर तुला जिवंत सोडणार नाही”अशी धमकी दिली आहे.आमच्या भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी निशांत राजेंद्र झावरे हा आला त्याने आमची भांडणे सोडवली आहे.त्यामुळे आपली वरील चारही आरोपी विरुद्ध तक्रार आहे.

दरम्यान दुसऱ्या फिर्यादीत समीर जाधव याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण धारणगाव रोड गणेश कॉलनी येथील रहिवासी असून आपण कोपरगाव बस स्थानकाजवळ “तारा पान” नावाचे पान दुकान चालवतो.मंगळवार दि.०१ मार्च रोजी सायंकाळी ०५.३० वाजेच्या सुमारास आपण आपल्या वरील पानाच्या दुकानावर असताना त्या ठिकाणी आरोपी किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनु संदीप दळवी,निशांत राजेंद्र झावरे आदी चार जणांनी येऊन मागील भांडणाचे कारण उकरून काढून मला शिवीगाळ करू लागले.तेंव्हा मी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी गजाने आपल्या पानाच्या दुकानांचे काचेचे काउंटर तोडून नुकसान केले आहे.तसेच,”आमचेशी भांडण करता काय ? असे म्हणून धमकी दिली आहे.

दरम्यान यात उत्तर नगर जिल्हा जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा तर दुसरा गट हा जिल्हा उपप्रमुख यांचा गट असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यात पूनम टॉकीज समोरील अतिक्रमण कारणीभूत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या दोन्ही नेत्यांनी एकमेकास बस स्थानकासमोरील दुकानासमोर उशिरा एकमेकांचा आमने-सामने उद्धार केल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान दोन्ही प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी दोन्ही गटाविरुद्ध अदखल पात्र गुन्हा क्रं.११७/११८/२०२२ भा.द.वि.कलम ४२७,५०४,५०६,अन्वये दोन्ही गटाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close