कोपरगाव तालुका
कोपरगावतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ…यांना “गुरुचिन्तामणी”पुरस्कार प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सकल दिगंबर जैन समाजातर्फे जैन संतांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार केल्याने आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना “गुरुचिन्तामणी” या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या गौरवाबद्दल नगर जिल्ह्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“आयुर्वेदातील मिळालेल्या अनेक पुरस्कारानंतर प्रदीद्ध जैन मुनी व समाज यांनी आपल्याला दिलेला हा पुरस्कार हा आयुर्वेदाचा गौरव वाढवणारा असून हा पुरस्कार म्हणजे जैन संतांनी आपल्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे”-डॉ.रामदास आव्हाड,कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ञ.
भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या वनस्पतींचे जतन केले.त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या.ऋग्वेद,आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला.चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे.आजही भारतात या युर्वेदीक वनस्पतींचा वापर यशस्वीपाने करणारे तज्ज्ञ असून त्या वनस्पतींचा वापर करण्याचे ज्ञान जतन करून ठेवले जात आहे.कोपरगावातील आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांचा त्यात समावेश आहे.
डॉ.आव्हाड हे कोपरगाव सह नाशिक शहरात गेल्या पस्तीस वर्षापासून कोपरगाव परिसरात आयुर्वेदिक सेवा करत असून त्यांच्या या लक्षवेधी सेवेबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.या शिवाय “राष्ट्रीय गुरु” म्हणूनही अनेक वर्षांपासून त्यांना केंद्र सरकारने त्यांना गौरवले आहे.त्यांच्याकडे देशभरातून अनेक विद्यार्थी विद्यार्जनाचे काम करत आहेत.आलेल्या सर्व साधुसंतांची निस्वार्थ वैद्यकीय सेवा करणारे कोपरगाव येथील डॉ.रामदास आव्हाड यांची ख्याती आहे.दर गुरुवारी साई दरबारी ते आपली निस्वार्थ सेवा बजावत असतात.
कोपरगाव येथे आचार्य १०८ श्री वर्धमान सागर महाराज यांचा संघ महिन्याभरासाठी आला होता.या दरम्यान अन्य गुरूंच्या प्रकृतीवर उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.हे सर्व जैन संत फक्त आयुर्वेदिकच औषधी घेत असल्याने त्यांना तो औषधोपचार करून डॉ.आव्हाड यांनी हि साधूसंतांची सेवा चोख बजावली आहे.
दरम्यान आचार्य वर्धमान सागर महाराज यांना कडाक्याच्या थंडीमुळे व सद्यस्थितीतील कोरोना परिस्थितीमुळे न्यूमोनिया व कोरोनाचा संसर्ग झाला होता.तीव्र ज्वर,सर्दी,खोकला व अन्य तीव्र लक्षणे असतांना त्यांना फक्त आयुर्वेदिक औषधावर बरे करण्याचे मोठे आव्हान डॉ.आव्हाड यांचे समोर होते.त्यात विशेष म्हणजे हि संत मंडळी फक्त एक वेळा सकाळी आहार घेतानाच औषधी घेतात.कितीही त्रास झाला किंवा अत्यवस्थ असले तरीही ते औषधी तर दूरच परंतु पाण्याचा एक थेंबही घेत नाहीत अशी माहिती प्राप्त झाली आहे.अशा परिस्थितीत त्यांना फक्त एक वेळ औषधी देऊन त्यांना असलेला व्याधी,१०३ डिग्री ताप बरे करणे हे खूप आव्हानात्मक काम होते.पस्तीस वर्ष्याचा अनुभव व आयुर्वेदावरील नितांत श्रद्धा यामुळे जैन गुरूंच्या नियमानुसार औषधोपचार देऊन फक्त चार दिवसात आचार्यांना डॉ.आव्हाड यांनी व्याधीमुक्त केले.त्यांचे सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल फक्त चार दिवसात नकारात्मक आले.या कठीण प्रसंगी जैन आचार्यांच्या संघावर आलेले संकट आयुर्वेदामुळे टळले आहे.याबद्दल व मागे कित्येक वर्षापासून दिलेल्या सेवेबद्दल आचार्य वर्धमान सागर,हितेश महाराज व सकळ दिगंबर जैन समाजातर्फे डॉ.रामदास आव्हाड यांचा “गुरुचिन्तामणी” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी आचार्य वर्धमान सागर महाराज,प्रसिद्ध व्यापारी चंद्रकान्तसेठ ठोळे,गंगवाल यांनीं डॉ.अवहाड यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला आहे.
दरम्यान,”आयुर्वेदातील मिळालेल्या अनेक पुरस्कारानंतर घरच्या व्यक्तीकडून आयुर्वेदामुळे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे घरच्यांची पाठीवरील कौतुकाची थाप असल्याचे प्रतिपादन डॉ. रामदास आव्हाड यांनी केले आहे.