गुन्हे विषयक
कोपरगावात एका इसमाचे निधन,अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या साईबाबा चौका नजीक असललेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईबाबा मंदिरासमोर असलेल्या एका पत्र्याच्या शेडवजा बस स्थानकामध्ये एक इसम जपलेल्या अवस्थेत आढळला असता जवळ जाऊन पहिले असता तो मृत अवस्थेत असल्याची खबर कोपरगाव येथील रुग्णवाहिका चालक अमित साहेबराव खोकले (वय-३७) रा.गांधीनगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.दरम्यान सदर व्यक्ती भिकारी असावा असा कयास व्यक्त होत असून त्याची ओळख पटविण्यात अद्याप अपयश आले आहे.
अमित खोकले हे आपल्या रुग्णवाहिकेतून आज दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजेच्या दरम्यान शिर्डी येथे एक रुग्णांस उपचारार्थ सोडून आपल्या राहत्या घरी परत येत असता त्यानां कोपरगाव नजीक साईबाबा ट्रस्टच्या साईबाबा मंदिराच्या समोर नगर-मनमाड या राज्य मार्गावर एका बस स्थानकाच्या शेड मध्ये एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळला आहे.त्याला उपचारार्थ दाखल केला असता हि दुर्घटना उघड झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार अमित खोकले हे आपल्या रुग्णवाहिकेतून आज दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजेच्या दरम्यान शिर्डी येथे एक रुग्णांस उपचारार्थ सोडून आपल्या राहत्या घरी परत येत असता त्यानां कोपरगाव नजीक साईबाबा ट्रस्टच्या साईबाबा मंदिराच्या समोर नगर-मनमाड या राज्य मार्गावर एका बस स्थानकाच्या शेड मध्ये एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यांनी संशय म्हणून त्या ठिकाणी जवळ जाऊन पहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला असता त्यांनी त्यास आपल्या रुग्णवाहिकेतून त्यास ग्रामीण रुग्णालायत कोपरगाव येथे आणले होते. तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याची तपासणी केली असता तो मृत अवस्थेत आढळला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तिकेत सी.आर.पी.सी.-१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.दरम्यान हा इसम या ठिकाणी आराम करण्यासाठी थाम्बला असावा व तेथेच आजारी असल्याने मृत झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे.या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.