कोपरगाव तालुका
कोपरगावात वाळूचोरीच्या वाहनांचा लिलाव,…कोटींचा महसूल जमा
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळूचोरीची समस्या गंभीर रूप घेऊ लागली असून तिच्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.त्यातून महसूल विभाग अनेक वाहनांना जप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो.त्यातून अनेक वर्षात अनेक जे.सी.बी.ट्रॅक्टर,डंपर,ट्रेलर,जप्त करण्याची मोहीम अनेक वेळा जीव धोक्यात घालून महसूल अधिकारी व कर्मचारी राबवित असतात.अशाच अनेक वाहनांना दंड केला जातो तर काही वहांनाचा गंभीर गुन्हा असल्याने ते जप्त केलेली असतात.मात्र ती वाहने नेण्यासाठी मूळ वहान मालक येत नाही किंवा तो दंड भरण्याची त्यांची क्षमता नसते.किंवा तो वाहनाच्या किमतीपेक्षा जास्त असल्याने वाळूचोर त्याकडे सोयींस्कर दुर्लक्ष करतात.त्यातून अनेक वहाने तहसील आवारात जागा व्यापून दोन अंगुळे उरताना दिसत असतात.त्यातून हि वहाने अखेर कोठे ठेवावी ? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.अखेर हि वहाने लिलाव प्रक्रिया करून विक्री केली जातात.
“दरम्यान उपलब्ध एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा मोठा महसूल मिळाला आहे.उर्वरित १९ वहाने जी वहाने लिलावात गेलेली नाही त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी केला जाणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनीं त्यात सहभाग नोंदवावा”- योगेश चंद्रे,तहसीलदार,कोपरगाव.
असाच लिलावाची प्रक्रिया नुकतीच महसूल विभाग कोपरगाव यांनी राबवली आहे.त्यात मोठ्या संख्येने वाहनांचा समावेश होता.अशाच अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रीया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालय कोपरगाव येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतला आहे.
सदर लिलावामध्ये एकूण ४५ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची एकूण रक्कम ७५ लाख रुपये आहे.कालच्या लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण २६ वाहने हे लिलाव प्रक्रियेमध्ये घेतले असून त्यातून शासनाला ४७ लाख एवढा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
लिलावात पुढील प्रमाणे ४५ होती.त्यात ट्रॅक्टर-२७ ,टाटा झेनोन -७,डम्पर-५,जे.सी.बी.-५,ट्रक -१,यापैकी लिलावात गेलेली वाहने.पुढील प्रमाणे- ट्रक्टर -ट्रॅक्टर-१९,टाटा झेनोन-३,डम्पर-३, जे.सी.बी .-०,ट्रक -१आदींचा समावेश होता.
दरम्यान “उपलब्ध एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा मोठा महसूल मिळाला आहे.उर्वरित १९ वाहने जी वहाने लिलावात गेलेली नाही त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी लावणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनीं त्यात सहभाग नोंदवावा”असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी केले आहे.