गुन्हे विषयक
ट्रॅक्टरला कंटेनरची धडक,तरुण जागेवरच ठार,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बेट भागात संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास राजस्थान येथील कंटेनरने (क्रं.आर.जे.०६,जी.सी.४६२१) कोकमठाण येथील कांदे घेऊन बाजार समितीकडे जाणाऱ्या फार्मट्रॅक्ट ट्रॅक्टरला ( क्रं.एम.एच.१५ डी. यू.१११०) ला जोराची धडक दिल्याने त्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात तरुण शेतकरी शंकर खंडेराव लोहकणे (वय-३०) रा.कारवाडी,कोकमठाण हा जागीच ठार झाला आहे.त्यामुळे कोकमठाण परिसरात शोककळा पसरली आहे.
ट्रॅक्टर चालक शंकर लोहकणे हे आपल्या चुलत भावाच्या ट्रॅक्टरमध्ये आपला कांदा घेऊन कोपरगाव बाजार समितीत लिलाव करण्यासाठी जात असताना सदरचा ट्रॅक्टर हा पुणतांबा फाटा येथून कोपरगावकडे वळला असताना व जनार्दन स्वामी आश्रमाजवळ असताना मागील बाजूने नगरकडून राजस्थानकडे भरधाव वेगाने जाणारा वरील क्रमांकाच्या कंटेनरने जोराची धडक दिली त्यात हा तरुण ठार झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,ट्रॅक्टर चालक शंकर लोहकणे हे आपल्या चुलत भावाच्या ट्रॅक्टरमध्ये आपला कांदा घेऊन कोपरगाव बाजार समितीत लिलाव करण्यासाठी जात असताना सदरचा ट्रॅक्टर हा पुणतांबा फाटा येथून कोपरगावकडे वळला असताना व जनार्दन स्वामी आश्रमाजवळ असताना मागील बाजूने नगरकडून राजस्थानकडे भरधाव वेगाने जाणारा वरील क्रमांकाच्या कंटेनरने जोराची धडक दिली त्यात त्या ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीररीत्या जखमी झाला होता.त्यास नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यात त्यांचे निधन झाले आहे.अपघातानंतर कंटेनर चालक हा फरार झाला आहे.या अपघाताने कोकमठाण परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी गोकुळ आप्पासाहेब लोहकणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील राजस्थान येथील कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा र.क्रं.२१७/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,१७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.