गुन्हे विषयक
शेण काढण्यावरून सुनेने सासऱ्यालाच बदडले,कोपरगावात चौघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या सुन गीता पवार हिला सासऱ्याने शेण काढण्याचे काम सांगितले असता तिने आपल्या माहेराहून आपल्या नातेवाईक भाऊ गोरख सोनवणे,मच्छीन्द्र सोनवणे,व आई सिंधुबाई सोनवणे यांना बोलावून घेऊन त्यांचेकडून चक्क सासऱ्याला काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याचा गुन्हा त्याच गावातील फिर्यादी सासरा संजय दशरथ पवार (वय-४९) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने करंजी परिसरात खळबळ उडाली आहे.सुनेच्या ‘या’ प्रतापाबद्दल कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
फिर्यादी सासरे संजय पवार हे आपल्या सून गीता पवार हिला म्हणाले की,”जनावरांचे शेण उचल” याचा राग आरोपी सून गीता पवार हिला आला तिने या रागात आपले नातेवाईक असलेल्या शिउर ता.वैजापूर येथील नातेवाईक भाऊ व आई यांना फोन करून बोलावून घेतले व त्यांना याबाबत सविस्तर सांगून फिर्यादि सासरा संजय पवार,यास आरोपी सून गीता पवार,तिचा भाऊ गोरख रेवजी सोनवणे,मच्छीन्द्र सोनवणे, व आरोपी आई सिंधुबाई रेवजी सोनवणे यांनी आपल्या हातातील लाकडी काठीने फिर्यादी सासरे यांनाच बदडले आहे.आता बोला ! या आधुनिक सुनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा करंजी येथील रहिवाशी असून त्याच्या मुलाचा विवाह हा शिउर ता. वैजापूर येथील मुलीशी झालेला आहे.आज सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सासरे संजय पवार हे आपल्या सून गीता पवार हिला म्हणाले की,”जनावरांचे शेण उचल” याचा राग आरोपी सून गीता पवार हिला आला तिने या रागात आपले नातेवाईक असलेल्या शिउर ता.वैजापूर येथील नातेवाईक भाऊ व आई यांना फोन करून बोलावून घेतले व त्यांना याबाबत सविस्तर सांगून फिर्यादि सासरा संजय पवार यास आरोपी भाऊ गोरख रेवजी सोनवणे,मच्छीन्द्र सोनवणे, व आरोपी आई सिंधुबाई रेवजी सोनवणे आदी चौघांनी आपल्या हातातील लाकडी काठीने फिर्यादी सासरे यांचे डावे हातावर मारहाण केली.त्यामुळे फिर्यादी सासऱ्याचा डावा हात सुजला असून पाठीवरही मारहाण केली आहे.सर्व आरोपीनी फिर्यादिस लाथा बुक्यांनी मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादि संजय पवार याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या आधुनिक (?) सुनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.क्रं.२६३/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.ए. आर.वाखुरे हे करीत आहे.