जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

रस्त्यावर वाढदिवस,नंग्या तलवारीची दहशत,कोपरगावात सात जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव सह राज्यात अद्यापही कोरोना साथीचा कहर सुरु असताना व राज्यात अद्याप दहा हजारांच्या दरम्यान रुग्ण बाधित होत असताना नागरिक या बाबत अक्षम्य दुर्लक्ष करताना दिसत असून वाढदिवसानिमित्त एका तरुणाला लक्ष करून नंग्या तलवारी नाचवून दहशत करून मोठा धिंगाणा घातला असल्याची माहिती हाती आली आहे.विशेष म्हणजे त्यात सत्त्ताधारी पक्षाचा आरोग्य सभापतीच सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी शिवाजी खांडेकर,राहुल बहादुरे, व त्यांचे इतर पाच ते सहा साथीदार यांचेवर गुन्हा दाखल केला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

एका मित्राचा वाढदिवस असल्याचे निमित्ताने या आरोपीनी दत्तनगर परिसरात एकत्र येऊन रस्त्यांवर गर्दी करून हा धिंगाणा केला आहे.एवढेच नाही तर यातून एका तरुणाला शिवीगाळ करून त्याच्या मागे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मारुती गाडीतून आरडा ओरडा करत शिविगाळ केली आहे.व नंग्या तलवारी नाचवल्या आहे.या घटनेत काही तरुणांनी दुसऱ्या गटाच्या तरुणावर दगडफेक केली त्यातील काही दगड हे नजीकच्या मशिदीकडे गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.त्यातील पांढऱ्या रंगाची ‘मारुती ओमनी’ पोलिसानी जप्त केली आहे.

राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे.राज्यात काल ०८ हजार ३९५ रुग्णांना उपचारानंतर सोडून दिले आहे. तर ०९ हजार ४८९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या एक लाख १७ हजारांच्या वर आहेत.काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारी नुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ०१ हजार २८९ तर कोल्हापूर शहरात ३७६ असे एकूण ०१ हजार ६६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील ३८ शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.हि समाधानाची बाब असली तरी ‘डेल्टा प्लस’ हा जीवघेणा व या दुसऱ्या साथी पेक्षा वेगवान प्रसार होत असलेला विषाणू आता समोर उभा येऊन ठाकला असताना काही नागरिक अद्यापही आपल्या बेजबाबदारीचे प्रदर्शन घडवत असताना दिसत आहे.एक वेळ सामान्य नागरिकाने हि चूक केली तर ती क्षम्य म्हणता येईल मात्र त्यात सत्ताधारी पक्षाचा सभापती सामील असेल तर हि बाब गंभीरच मानली पाहिजे.अशीच घटना कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे. दि.२९ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्तनगर परिसरात घडली आहे.एका मित्राचा वाढदिवस असल्याचे निमित्ताने या आरोपीनी दत्तनगर परिसरात एकत्र येऊन रस्त्यांवर गर्दी करून हा धिंगाणा केला आहे.एवढेच नाही तर यातून एका तरुणाला शिवीगाळ करून त्याच्या मागे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मारुती गाडीतून आरडा ओरडा करत शिविगाळ केली आहे.व नंग्या तलवारी नाचवल्या असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.व जिल्हाधिकाऱ्यांच्या साथ रोग प्रतिबंधक कायदा-१८९७ च्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.यात दोन समाजाचे नागरिक आमने-सामने आल्याने तणाव वाढला होता.या घटनेत काही तरुणांनी दुसऱ्या गटाच्या तरुणावर दगडफेक केली त्यातील काही दगड हे नजीकच्या मशिदीकडे गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.त्यातील पांढऱ्या रंगाची ‘मारुती ओमनी’ पोलिसानी जप्त केली आहे.या परिसरात वारंवार घटना घडत असल्याने त्याकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०४/२०२१, भा.द.वि.कलम १८८,२६९,२७०,मुबंई पोलीस कायदा कलम ३७(११)(३) अन्वये आरोपी शिवाजी खांडेकर,राहुल बहादुरे व त्यांच्या इतर पाच ते सहा साथीदारावर गुन्हा दखल केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close