जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

रेल्वेतून पडून महिलेचा मृत्यू,कोपरगावात अकस्मात म्रुत्युची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील रिद्धीसिद्धी नगर या उपनगरातील रहिवाशी असलेली महिला सुजाता विलास धनेश्वर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास खिर्डी गणेश शिवारात आगगाडीतून पडून डोक्याला मार लागून मृत्यू झाला असल्याची माहिती कोपरगाव येथील रेल्वेचे स्थानक प्रमुख यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठण्यात दिली असून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सदर महिला हि रेल्वेने प्रवास करत असताना दि.०४ जुलै रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास खिर्डी गणेश शिवारात रेल्वेतून पडली या घटनेत या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यात त्या महिलेचे निधन झाले आहे.या घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या दरवाजात उभे राहण्याचे टाळणे गरजेचे आहे.

सदर महिला हि रेल्वेने प्रवास करत असताना दि.०४ जुलै रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास रेल्वेतून पडली या घटनेत या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यात त्या महिलेचे निधन झाले आहे.या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी कोपरगाव रेल्वे स्थानक प्रमुख यांना दिली व त्यांनी या बाबतची खबर कोपरगाव तालुका पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तक क्रं.२५/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close