जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील ‘त्या’ खुनीं आरोपींना…इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तरुण व ट्रॅक्टर मालक महेश सोन्याबापू मलिक (वय-३२) रा.कासली याचा मानेवर निर्दयपणे कुऱ्हाड चालवून त्याच्या मानेचे दोन तुकडे करणारा प्रमुख आरोपीं चेतन असणे व त्याचा भाऊ केशव आसने यान दोघांना कोपरगाव तालुका पोलिसानी मोठ्या शिताफीने अटक करून त्यांना आज कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना येत्या ०८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयत महेश मलिक याचे छायाचित्र

दरम्यान प्रमुख आरोपीचा भाऊ केशव आसने व त्याची आई या हत्येच्या घटनेनंतर जिवाच्या भीतीने रात्रीच पोलीस ठाण्यात हजर झाले होते.त्या नंतर पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्याने त्यांनी आपले फासे टाकण्यास तात्काळ प्रारंभ केल्याने आरोपीना पकडणे सोपे झाल्याचे बोलले जात आहे.व काही तासात आरोपी जेरबंद झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महेश मलिक याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरून ट्रॅक्टरचा चालक व आरोपी चेतन बापू आसने यांचेशी काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते.त्यातून वाद नको म्हणून परागंदा झाला होता.मात्र दि.एक जुलै रोजी तो त्याच्या गावात आल्याची भणक मयत महेश मलिक याला लागून तो त्याचा जाब विचारण्यासाठी पढेगाव येथे त्याच्या घरी गेला असता त्याने प्रथम घराच्या बाहेर उभी असलेली पिकअप गाडीची तोडफोड करून प्रमुख आरोपी चेतन बापू आसने याचा भाऊ केशव बापू आसने यांची आधी झटापट झाली त्या वेळी प्रमुख आरोपी जीव वाचविण्याच्या उद्देशाने लपून बसला होता.मात्र त्या हाणामारीत मयत सरस पडत असल्याचे पाहून तो बाहेर आला व त्याने आधी काठीने डोक्यावर वार केला त्याने तो खाली पडला असता त्याने आपल्या हातातील कुऱ्हाडीचा मयताच्या मानेच्या डाव्या बाजूवर मोठा घाव घालून एका गावात मानेचे दोन तुकडे केले केवळ त्वचेचा काही भाग अडकवून राहिल्याने दोन तुकडे होण्याचे बाकी रहिले होते.त्यात त्याचा जागेवरच खून झाला आहे.त्या नंतर आरोपी व त्याच्या भावाने त्यास आपल्या गाडीत टाकून मृतदेहाची वाट लावण्यासाठी मुख्य आरोपी गाडीसह रात्रीच फरार झाला होता.त्या नंतर यातील प्रमुख आरोपी चेतन आसने याने त्याचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील हरसुलच्या जंगलात फेकून देऊन.त्याने आपले नातेवाईक असलेल्या चांदोरी टाकळी फाटा ता.निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आरोपी येणार असल्याचा सुगावा पाळतीवर असलेल्या कोपरगाव तालुका पोलिसांना लागला असता होता. त्यांनी त्या ठिकाणी आरोपी येण्याच्या आधीच पाळत ठेऊन सापळा लावून प्रतीक्षा पाहत असताना आरोपी तेथे गाडीसह आला मात्र त्याला पोलीस आल्याची चाहूल लागली.व त्याने पुन्हा आल्या पावली फरार होण्यासाठी आपली गाडी वळवली त्यावेळी पोलिसानी मोठ्या तडफेने त्यास जीवाची बाजी लावून अटक केली आहे.व त्याला आपला हिसका दाखवला असता त्याने आढेवेढे न घेता मृतदेह फेकून दिल्याची जागा दाखवून दिली आहे.हा परिसर जवळपास गुजरातच्या सीमेवर असून अत्यन्त किर्र झाडी असलेला असल्याची माहिती मिळाली आहे.प्रमुख आरोपीच्या तीन तासात मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान यातील मयत हा छायाचित्रकार असल्याची ताजी माहिती हाती आली आहे.व या कोपरगावच्या पूर्व भागात नावाजलेला छायाचित्रकार होता.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान प्रमुख आरोपीचा भाऊ केशव आसने व त्याची आई हि घटनेनंतर जिवाच्या भीतीने रात्रीच पोलीस ठाण्यात हजर झाले होते.त्या नंतर पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्याने त्यांनी आपले फासे टाकण्यास तात्काळ प्रारंभ केल्याने आरोपीना पकडणे सोपे झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.इरफान शेख,जयदीप गवारे,आदींनी मोलाची भूमिकां निभावली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close