जाहिरात-9423439946
कृषी विभाग

लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे कृषी दिन साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लायन्स क्लबच्या वतीने कृषि दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.त्याबाबत स शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून राज्यात कृषी क्रांती घडवून राज्याच्या कृषी विभाग विकासाला योग्य दिशा दिली होती,एक जुलै रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो.या निमित्ताने लायन्स क्लब व लिओ क्लब च्या वतीने कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून राज्यात कृषी क्रांती घडवून राज्याच्या कृषी विभाग विकासाला योग्य दिशा दिली होती,एक जुलै रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो.या निमित्ताने लायन्स क्लब व लिओ क्लब च्या वतीने कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सदर प्रसंगी लायन्सचे सेक्रेटरी-अक्षय गिरमे,ट्रेझरर – सुमित भट्टड,लिओ अध्यक्ष-आदित्य गुजराथी,सेक्रेटरी-पृथ्वी शिंदे,मनन ठोळे,सम्यक गंगवाल,प्रोजेक्ट चेअरमन- सुरेश शिंदे,ज्ञानेश्वर थोरे आदी मान्यवर उपस्थित होतेसदर प्रसंगी प्रसाद परजणे दूध उत्पादक,दीपक रक्ताटे-दूध उत्पादक,भास्कर सुरळकर-शेतीव्यवसाय,बापू सुराळकर-राष्ट्रपती पुरस्कार विजेते,संदीप मालकर- हळद उत्पादक,उमेश लोंढे कोकमठाण-सोयाबीन उत्पादक,प्रशांत सुरळकर-येसगाव कांदा ऊस उत्पादक,संदीप देवकर टाकळी कांदा उत्पादक,दत्तात्रय सुराळकर-येसगाव ऊस उत्पादक,राजू कोल्हे-येसगाव-दूध उत्पादक,राजू निकोले-ऊस उत्पादक या शेतकऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला असून उर्वरीत शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या देशातील सत्तर टक्के लोक शेती व्यवसाय करतात आणि म्हणून हा शेतीप्रधान देश समजला जातो.परंतु शेती प्रधान देश असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा सन्मान दिला जात नाही.आजही शेती प्रधान शेतकरी राजा विविध समस्यांना तोंड देत आहे. विविध समस्या असताना सुद्धा काही शेतकरी या कठीण प्रसंगी,अडचणींमध्ये आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम करून देशाला एक नवीन दिशा देत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान आहे या उद्देशाने लायन्स क्लब,लिओ क्लबने प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी दिनानिमित्त केला आहे असे लायन्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष राम थोरे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close