जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

टेलरचे दुकान फोडले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले व शिंपी काम करणारे टेलर नवनाथ निवृत्ती सोनवणे (वय-३८) यांच्या दुकानातील कपड्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आज पहाटे एक वाजेच्या सुमारास त्याच गावातील आरोपी सागर एकनाथ सोनवणे याने फोडले असून त्यातील पाच हजार रुपये किंमतीच्या कपड्यांची चोरी केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी हे नेहमी प्रमाणे आपले दुकान सायंकाळच्या सुमारास बंद करून ते घरी गेले असता आज पहाटे एक वाजेच्या सुमारास आरोपी सागर सोनवणे याने फिर्यादीच्या दुकानाचे शटर बंद असताना त्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून त्यातील सुमारे पाच हजारांचे कपडे आपल्या फायद्यासाठी चोरून नेले आहे.हि सकाळी फिर्यादी आपल्या दुकानात आल्यावर त्यांना कळली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी नवनाथ सोनवणे व आरोपी सागर सोनवणे हे एकाच गावातील रहिवाशी असून फिर्यादी नवनाथ सोनवणे हे व्यवसायाने शिंपी (ट्रेलर) आहे.त्यांनी नेहमी प्रमाणे आपले दुकान सायंकाळच्या सुमारास बंद करून ते घरी गेले असता आज पहाटे एक वाजेच्या सुमारास आरोपी सागर सोनवणे याने फिर्यादीच्या दुकानाचे शटर बंद असताना त्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून त्यातील सुमारे पाच हजारांचे कपडे आपल्या फायद्यासाठी चोरून नेले आहे.हि सकाळी फिर्यादी आपल्या दुकानात आल्यावर त्यांना कळली व त्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.क्रं.२०९/२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close