जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घरमालक व रिक्षाचालकांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,शिर्डीत दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

साकुरी-(प्रतिनिधी)

शिर्डी शहरातील आपल्या मुलीला प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी मदत केली या आरोपावरून भाडेकरू असलेल्या सविता सोमनाथ गायकवाड या महिलेला जबाबदार धरून आरोपी विनायक सोपानराव चौधरी (वय-४२) रा.नादुर्खी व रिक्षा चालक रवि पवार रा शिर्डी (वय- ३६) या दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने तीने विषारी औषध प्रश्न करून आपली जीवन यात्रा संपवली आहे त्यामुळे नांदूरखी शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

“या प्रकरणात दोष नसताना माझ्या
आईला आत्महत्या करावी लागली आमचे कुटुंब उघड्यावर आले असून आमच्या कुटुंबाला जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी न्याय द्यावा”-भाग्यश्री गायकवाड मयत महिलेची मुलगी.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला सविता सोमनाथ गायकवाड हिने राहत्या जवळ प्रवासात असताना ‘रोगर’नावाचे विष प्राषन करुन आत्महत्या केली अशी तक्रार मयत महिलेचा पती सोमनाथ मल्हारी गायकवाड (वय-४२) रा आंबी ता.राहुरी ह.मु.नांदूरखी याने शिर्डी पोलीस ठाण्यात दि. १ मे रोजी दाखल केली आहे.शिर्डी पोलिसांनी आरोपी विनायक सोपानराव चौधरी (वय-४२) रा.नादुर्खी व रिक्षा चालक रवि पवार रा शिर्डी (वय- ३६) या दोघांच्या विरोधात भा.द.वी. ३०६,५०४,५०६ व अनुसूचित जाती जमाती अन्वये ३/(२)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत सविता सोमनाथ गायकवाड हि पती व दोन मुली सह चौधरी वस्ती येथे ३वर्षापासुन राहत होती.ती ज्या वस्तीवर राहत होती त्या चौधरी नामक घरमालकाने आपली मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती.ती पळुन जात असताना त्या प्रकरणात मयत सविता गायकवाड हिच्या मोबाईलचा वापर झाला होता असे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.ती औषध उपचार घेत असताना दि.१ मे रोजी पहाटे साईबाबा संस्थान रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता व त्यात रिक्षा चालक रवि पवार यांचा सहभाग निष्पन्न झाला होता. यात विनायक सोपानराव चौधरी याने,”माझ्या मुलीचा तपास लागला पाहिजे,नाहीतर तुला व तुझ्या मुलिला व पतीला सोडणार नाही”अशी धमकी दिली होती.परिणामस्वरूप माझ्या पत्नीने टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली आहे”अशी तक्रार पती सोमनाथ मल्हारी गायकवाड यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्या अनुषंगाने या घटनेचा अधिक तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल मदणे हे करीत आहे. मयत महिलेला काही दिवसांपूर्वीच कोरोणा झाला होता विलिनीकरणात असताना दमबाजी झाल्याने या महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात जे कोणी पाठबळ देणारे असतील त्यांचा शोध घेतला जावा विष कसे उपलब्ध झाले विनायक चौधरी यांच्या पत्नीला देखील गजाआड करावे अशी मागणी भारतीय विर लहुजी संघटनेचे शिर्डी शहरातील अध्यक्ष समीर वीर यांनी केली आहे.

या बाबत न्याय मिळाला नाहीतर आपण जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना देखील भेटणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.घरमालक व रिक्षाचालकांच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची शिर्डी शहरात आत्महत्या
दोन जनावर गुन्हा दाखल शिर्डी शहरात खळबळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close