जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगातील ‘तो’ हसतमुख ‘पेपरवाला’ अखेर काळाच्या पडद्याआड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवाशी व भल्या सकाळीच ग्रामस्थांची वाचनाची तहान भागविणारा पेपरवाला अर्थात दत्तात्रय बिडवे (वय-४७) यांना आपल्या जवळच्या नातेवाईकाला उपचारार्थ घेऊन फिरण्याचा प्रसंग आल्याने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर त्यांना कोरोनाने गाठले असून त्यात त्यांचा अत्यंत करूण अंत झाला आहे.त्यांच्या निधनाची वार्ता अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,तीन भाऊ असा परिवार आहे.

वृत्तपत्र विक्रेते रामभाऊ ठोंबरे आणि त्यांच्या व्यवहाराची सुरुवात आणि चर्चा अनेक वेळा ‘दत्तोबा’ मला डोळा मारूनच करीत असे.व रामभाऊला मुद्दामहून चिडविण्याची व आम्हा उपस्थितांना हसविण्याची एकही संधी दत्तोबा सोडीत नसे.आम्हाला हि मेजवानी मिळत असे पण त्यावेळीच शहरातील समस्त वर्तमानपत्र विक्रेते मुले पेपर घेणारे उपस्थित विस्मयचकित होऊन हा संवाद पाहत असे.हा व्यवहार त्या व्यवहाराचा संवाद साधण्याची संधी कधीच कोणीच कधी चुकवीत नसे आता ते चित्र कायमचे दृष्टीआड गेले आहे.

मृत्यू हा कोणालाही चुकवता येत नाही.ज्याचा या भुतलावर जन्म झाला त्याला मृत्यू अटळ आहे.व हे अंतिम सत्य आहे.मात्र तो अकाली आल्यावर अनेकांची स्वप्न चक्काचुर करून जातोच पण अनेकांच्या मनाला चटकाही लावून जातो व आयुष्यभराची पोकळी माणसाच्या मनात निर्माण करतो.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली असून येथील रहिवाशी असलेले दत्तात्रय बिडवे हे अत्यंत लोभनिय व्यक्तिमत्व असलेले गृहस्थ होते.सुरुवातीला त्यांनी तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या सहकारी बँकेत नोकरी पत्करली होती.मात्र काही वर्ष नोकरी केल्यानंतर ‘ती’ बँक डबघाईला आल्यावर प्रशासनाने ज्या अनेकांना नोकरीतून काढून टाकले त्यात दुर्दैवाने याच बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे नाव आल्याने त्यांच्या चुलीत अकाली पाणी पडले होते.त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजाने वर्तमानपत्र टाकण्याचा पर्याय स्वीकारला होता व त्यातून ते ईशान्येकडील सर्व कोपरगाव शहर व पुढे साखर कारखाना मार्गे संवत्सर असा पेपर वाटत त्यांचा गावाकडे जाण्याचा दिनक्रम असे. त्यात त्यांचे आणखी एक सहकारी येसगाव येथील बाळासाहेब आहेर हे हि होते.मात्र त्यांची दिशा पुढे उत्तरेला सरकत असे.त्यांनी अखेर कोणाच्या ‘पाया’ पडण्या ऐवजी एक विचाराने व आपला ‘स्वाभिमान’ जपण्यासाठी वर्तमानपत्र टाकण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व तो अंमलबजावणीतही आणला होता.त्यातून दोघांच्या प्रपंचाचा गाडा सुरळीत सुरु झाला होता आता त्याला काही वर्षाचा कालखंड लोटला होता.नोकरी गेल्याचे दुःख त्यांनी अशा मार्गाने पचवले होते व आपल्या प्रपंचाचा गाडा रुळावर आणला होता.त्या दुःखाची एक रेषाही त्यांनी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिली नाही हे विशेष ! ते ज्याच्याशी बोलतील त्याचे दुःखच काही काळ हरवून जाणार असे ते विलोभनीय व्यक्तिमत्त्व होते.समोरच्याच्या मर्मावर आपल्या विनोदी शैलीत अचूक बोट ठेऊन त्याला न दुखवता पूर्ववत काही झाले नाही अशा अविर्भावात पुन्हा दुसऱ्याशी संवाद कधी सुरु केला हे कोणालाही कळत नसे.त्यांच्याकडे अनेकांच्या कुंडल्या असल्याने तालुक्यातील भल्या-भल्या राजकारण्यांच्या फिरख्या घेताना त्यांना थोडी विचार करण्याची गरज वाटत नसे.व कोणी त्यांच्या नादात पडण्याचा धोका पत्करत नसे. हे अगदी सहज साधण्याची ‘जीवनकला’ त्यांना प्राप्त झाली होती.त्यामुळे गावात सकाळी त्यांची वाट न पाहणारा माणूस विरळाच ! त्यांच्याशी संवाद साधला नाही असे घडले तर आज आपले काही तरी हरवले तर नाहीना अशी हुरहूर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण न झाली तर नवल ! असे विनोदी दत्तोबा आज आपल्यात राहिले नाही असे कोणालाही सांगूनही पटत नव्हते.मला बाहेरगावी असताना या बाबत आमचे त्यांच्याच गावातील प्रतिनिधी शिवाजीराव गायकवाड यांचा भ्रमणध्वनी आला त्यावेळी या घटनेवर विश्वासच बसत नव्हता.मी खोदून-खोदून विचारले तर पुन्हा-पुन्हा तेच बोलत राहिले व हि घटना खरीच आहे.असे सांगत राहीले. त्यामुळे त्या घटनेवर विश्वास ठेवावा लागला.

त्यांच्या कुटुंबातील जवळच्या नातेविकास कोरोनाने गाठले होते.व त्यांना दवाखान्यात घेऊन जात त्यांच्यावर औषधोपचार कर.त्यांच्या खानापिण्याची व्यवस्था कर अशी सेवा करताकरता या हसमुख दत्तोबांना कुठे माहिती होते की हा ‘कोरोना विषाणू’ आपलाही एक वेळ ग्रास घेणार आहे.त्यांचा भाबडा विश्वासाने त्यांचा घात केला आणि ‘ते’ नुकतेच सर्वांना सोडून गेले आहे.ते सकाळी सर्व वर्तमानपत्र जेंव्हा घ्यायला येत त्यावेळी ‘मी’ कोपरगाव बसस्थानकावर आवर्जुन समक्ष हजर रहात असे असा अनेक वर्षाचा शिरस्ता ठरला होता.पेपर विक्रेते तथा रामभाऊ ठोंबरे आमचा सकाळचा राम-राम ज्या जागी होत असे त्या आता कायमची थांबली आहे.त्या ठिकाणी आता हे विलोभनीय व्यक्तिमत्व केंव्हाच दिसणार नाही यावर आता विश्वास बसत नाही.रामभाऊ आणि त्यांच्या व्यवहाराची सुरुवात आणि चर्चा अनेक वेळा ‘दत्तोबा’ मला डोळा मारूनच करीत असे.व रामभाऊला चिडविण्याची व आम्हा उपस्थितांना हसविण्याची एकही संधी दत्तोबा सोडीत नसे.आम्हाला हि मेजवानी मिळत असे पण त्यावेळीच शहरातील समस्त वर्तमानपत्र विक्रेते मुले आपले पेपर घेताना उपस्थित वाचक विस्मयचकित होऊन हा संवाद पाहत असे.हा व्यवहार त्या व्यवहाराचा संवाद साधण्याची संधी कधीच कोणीच कधी चुकवीत नसे.त्यांचा सख्खा सोबती बाळासाहेब आहेर यांचा त्यानंतर ‘चहा-पाणी’ आणि मग वर्तमानपत्राचे वाटप असा अलिखित शिरस्ता अनेक वर्षाचा ठरला होता.ते ज्या ठिकाणी समता पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या उत्तर भारतीयांच्या चहाच्या टपरीवर हमेशा दिसत असत व नेमाने मला (मी चहा पित नसलो तरी) त्या निमित्ताने जोराची हाक मारून चर्चेला निमंत्रण देत असत पेपरात जाहिराती टाकत असतानाच संपूर्ण शहर व तालुक्याचा आढावा घेत असत.आता ‘ती सकाळ आणि विनोद’ यांचे अतूट नाते कायमचे संपले आहे.आता सकाळी दिसणारे ‘दत्तोबा’ कधीच दिसणार नाहीत त्यामुळे आता आमची ‘सकाळ’ होणार की नाही ? असे क्षणभर उगीच वाटून गेले खरे.अर्थात हे जीवनचक्र थेट परमेश्वराने माणसाचा जन्म घेतला तरी त्यालाही थांबवता येत नाही हेच खरे.टीचभर पोट माणसाला पळविल तिकडे आपण पळायचे असते हे जीवनाचे सार. आमच्या व आमच्या सकाळच्या प्रहरी अनेक वाचकांच्या मनात आपले ‘अढळ’ स्थान निर्माण केलेल्या एका सच्चा मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close