जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव तालुक्यात मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीतील गोदावरी नदी पात्रात विनाक्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो या पांढऱ्या रंगाच्या माल वाहतूक गाडीने त्याच गावातील आरोपी तुषार उर्फ भैया शांताराम दवंगे याने दि.१५ मार्च रोजी १०.५० वाजेच्या सुमारास ०५ हजार रुपये किमतीचा वाळूसाठा आपल्या गाडीतून चोरून वाहतूक करताना आढळून आला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी गाडीसह ०४ लाख ०५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून गुन्हा दाखल केला असल्याने मळेगाव थडी परिसरात वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.

गोदावरी नदी पात्रातून वैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंध आहे.मात्र या वाळूतून मिळणारा प्रचंड पैसा हा नदीकाठच्या तरुणांना स्वस्थ बसू देत नाही.या व्यवसायात विशेषतः सुशिक्षित बेकार तरुण व अर्धशिक्षित तरुणांचा मोठा भरणा आहे.ते कर्ज काढून डंपर,जे.सी.बी.आदी अवजड वाहने खरेदी करून या व्यवसायात उतरत आहे.त्यामुळे पोलीस व तालुका महसूल प्रशासनास मोठी डोखेदुखी ठरत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गोदावरी नदी पात्रातून वैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंध आहे.मात्र या वाळूतून मिळणारा प्रचंड पैसा हा नदीकाठच्या तरुणांना स्वस्थ बसू देत नाही.या व्यवसायात विशेषतः सुशिक्षित बेकार तरुण व अर्धशिक्षित तरुणांचा मोठा भरणा आहे.ते कर्ज काढून डंपर,जे.सी.बी.आदी अवजड वाहने खरेदी करून या व्यवसायात उतरत आहे.त्यामुळे पोलीस व तालुका महसूल प्रशासनास मोठी डोखेदुखी ठरत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.दि.१५ मार्च रोजी रात्री १०.५० वाजता आरोपी तुषार दवंगे हा आपल्या साथीदारांना घेऊन वाळू चोरी करत असतांना याची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली व त्यांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन घटनास्थळीच आरोपीस पकडले आहे.त्यात त्याची महिंद्रा पिकअप वाळूसह जप्त करण्यात आली आहे.व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८९/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये आरोपी तुषार दवंगे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close