गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रहिवाशी महिला (वय-२५) हिचा रावंदे येथील आरोपी याने घराजवळ येऊन वाईट नजरेने पाहून फिर्यादी महिलेच्या भावाच्या भ्रमणध्वनीवर फोन करून,”मी तुझ्याकडे येऊ का ? काही होईल का ? व प्रतिसाद न मिळाल्याचे पाहून,”तू”,”नवऱ्याला काही सांगितले तर मी त्याला मारून टाकील” अशी धमकी देऊन विनयभंग केला असल्याची फिर्याद चासनळी येथील महिलेने केल्याने चासनळी परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार चासनळी येथील फिर्यादी महिला हिचा आरोपी हा दीर असल्याची माहिती हाती आली असून हा दीर विक्षिप्त असल्याने त्याने हि कृती केली असल्याचे समजते व आपल्या नात्याला काळिमा फासल्याचे दिसून येत आहे,त्याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,” फिर्यादी महिला व आरोपी यांची ओळख आहे.फिर्यादी महिला हि घरी असताना आरोपी हा तिच्या घराशेजारी येऊन तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता.व नंतर त्याने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून (९५२९९७४४५८) वरून फिर्यादीचा भाऊ याच्या भ्रमणध्वनीवर फोन करून फिर्यादी महिलेस ,”मी तुझ्याकडे येऊ का ? काही होईल का ? व प्रतिसाद न मिळाल्याचे पाहून,”तू”, “नवऱ्याला काही सांगितले तर मी त्याला मारून टाकील” अशी धमकी देऊन विनयभंग केला व फिर्यादी महिलेचा पाठलाग करून विनयभंग केला असल्याची फिर्याद चासनळी येथील महिलेने केल्याने चास नळी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.८८/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,(ड),५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.