गुन्हे विषयक
सासऱ्याचा सुनेवर बलात्कार,कोपरगाव तालुक्यात गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील महिला आपल्या सासरी नांदत असताना आरोपी सासरा याने एकवीस वर्षीय फिर्यादी महिला अर्थात आपल्या सासरी सून एकटीच घरी असताना तिचे वर वेळोवेळी बळजबरीने संभोग केला व शिवीगाळ दमदाटी केली तसेच यातील फिर्यादीने आपला आरोपी नवरा यास सांगितली असता त्याने पण फिर्यादीस मारहाण केली असल्याचा गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या महिलेने गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला असा सवाल चौकशी पोलीस अधिकाऱ्यांना केला असता त्यांनी सदर फिर्यादी महिलेच्या वडीलांचे निधन झालेले असून आई आजारी असल्याने व ती भीतीने ग्रस्त असल्याने गुन्हा उशिरा दाखल केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तर या प्रकरणी आरोपी सासरा हा फरार झाला असून दुसरा आरोपी नवरा याला पोलिसानी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदरचे सवित्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहराच्या पश्चिमेस शिरसगाव ग्रामपंचायत असून या ठिकाणी फिर्यादी महिला हि रहिवासी असून तिचा विवाह हा शिरसगाव येथील तरुणाशी झालेला होता.सदर महिला हि दि.ऑगष्ट २०१८ मध्ये पहिल्या आठवड्यात घरी एकटीच असताना दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास नराधम सासरा याने तिच्या असहायतेचा गैर फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर दोन ते तीन वेळा याच कृत्याची पुनरावृति केली असल्याचे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.तिने हि बाब आपला नवरा याच्या लक्षात आणून दिली असता त्यानेही आपल्या वडीलांना साथ दिल्याचे फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.त्या घटनेनंतर हि महिला आपल्या माहेरी हल्ली मु.वाळूज पोलीस ठाण्याच्या मागे रहात असून तिने मोठा निर्धार करून काल रात्री आठ वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी सासरा ,व तिचा नवरा याचे विरुद्ध गुन्हा क्रं.७१/२०२१ भा.द.वि.कलम ३७६ (२) (एन),३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.